• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कथा पाहिजे तर अशी, 334 कोटी बजेट अन् कमाई 6783 कोटी रुपये, हा चित्रपट पाहण्यासाठी उडाली झुंबड

August 20, 2026 by admin Leave a Comment


हॉरर-थ्रिलर चित्रपटांची दुनिया नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करते. काही चित्रपट केवळ घाबरवत नाहीत तर त्यांची कथा आणि वातावरण बराच काळ प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. रहस्य, लहान मुलांची मैत्री, अनोळखी धोका आणि सतत वाढत जाणारी भीती यांचा सुरेख मिलाफ एखाद्या हॉरर चित्रपटाला अधिक प्रभावी बनवतो. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘IT’.

स्टीफन किंग यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अँडी मस्किएटी यांनी केले आहे. 8 सप्टेंबर 2017 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा अमेरिकेतील मेन राज्यातील डेरी या शहराभोवती फिरते. या शहरात रहस्यमय पद्धतीने मुलं गायब होऊ लागतात आणि त्यामागे एका भयानक जोकराचा हात असल्याचे समोर येते.

चित्रपटाची कथा खतरनाक

या चित्रपटात जेडेन मार्टेल, जेरेमी रे टेलर, सोफिया लिलिस, फिन वुल्फहार्ड, चोजन जेकब्स, जॅक डिलन ग्रेझर आणि वायट ओलेफ यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं पात्र म्हणजे पेनीवाइज हा भयानक जोकर. बिल स्कार्सगार्डने साकारलेल्या या पात्राने प्रेक्षकांच्या मनात अक्षरशः धडकी भरवली.

चित्रपटाची कथा 1989 च्या उन्हाळ्यातील घटनांवर आधारित आहे. डेरी शहरात लहान मुलं अचानक बेपत्ता होऊ लागतात. त्यानंतर काही मुलांना या रहस्यमय घटनांमागे पेनीवाइज नावाचा जोकर असल्याचा संशय येतो. मात्र हा सामान्य जोकर नसतो. तो एक रूप बदलणारी भयानक शक्ती असते, जी लोकांच्या भीतीचा वापर त्यांच्याविरुद्ध करते.

बजेटच्या 20 पट अधिक कमाई

‘IT’ प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः चित्रपटातील भयावह वातावरण, मुलांच्या अभिनयासोबतच बिल स्कार्सगार्डच्या पेनीवाइज या पात्राचे कौतुक झाले. IMDb वर या चित्रपटाला 7.3 रेटिंग मिळाली आहे.

बॉक्स ऑफिसवरही ‘IT’ने मोठी कमाई केली. जवळपास 334 कोटी रुपये बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 6783 कोटी रुपये कमावले. म्हणजेच चित्रपटाने आपल्या बजेटच्या 20 पटांहून अधिक कमाई केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in