• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कडक उन्हाळ्याच्या दिवसातही भारतातील या ठिकाणी तुम्हाला बर्फाचा घेता येईल आनंद, प्लॅन करा ट्रिप

May 23, 2026 by admin Leave a Comment


हिवाळा असो वा उन्हाळा डोंगराळ भागांमध्ये थंडावा व शांतता असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर वाढत्य उष्णतेच्या उकाड्यापासून वाचण्यासाठी अनेकजण उत्तराखंड आणि हिमाचलसारख्या ठिकाणीही जातात. पण जर तुमच्या प्रवासात हिरवीगार वनराई आणि बर्फाच्छादित पर्वतांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले तर? भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही मे महिन्यात तिथे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यासोबतच उन्हाळ्यातही बर्फाचा आनंद घेऊ शकता.

दूरवर पसरलेले बर्फाच्छादित पर्वत, थंडगार वारा… उन्हाळ्यातही असे नेत्रदीपक दृश्य पाहणे हे आपल्या मनाला एक ताजेपणा देणारा अनुभव आहे. जो तुमचा ताण नाहीसा करेल. जर तुम्ही धावपळीचे जीवन आणि तीव्र उष्णतेपासून शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आजच्या लेखात आपण अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

लडाखमधील खारदुंग ला

तुम्हाला जर उन्हाळ्यात बर्फाच्छादित डोंगराळ भागात फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही लडाखमधील खारदुंग ला येथे जायला हवे. हा जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्त्यांपैकी एक आहे. हा रस्ता लेहला नुब्रा आणि श्योक खोऱ्यांशी जोडणारे प्रवेशद्वार म्हणून काम करतो. तर या ठिकाणी उन्हाळ्यातही सर्वत्र बर्फ असतो, परंतु तुम्हाला या ठिकाणी फिरायला जायला परमिट असणे आवश्यक आहे तसेच तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण उंचीमुळे ऑक्सिजनची कमतरता भासू शकते.

स्पिती व्हॅली

उन्हाळ्यातही बर्फाचा आनंद घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीला भेट द्या. हे ठिकाण ‘थंड वाळवंट’ म्हणूनही ओळखले जाते. कुंझुम पाससारख्या प्रमुख खिंडी उन्हाळ्यातही बर्फाने झाकलेल्या असतात. चंद्रताल सरोवर हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे, जिथे भेट देण्याचे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते.

काश्मीरचा गुलमर्ग

जेव्हा सुंदर दऱ्यांचा विषय येतो, तेव्हा काश्मीरला कसे विसरता येईल? उन्हाळा असो वा हिवाळा काश्मीरला भेट देणे हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो. उन्हाळ्यात तुम्ही काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फ पाहू शकता. उन्हाळ्यात येथे बर्फवृष्टी होत नसली तरी, अफारवत शिखरासारख्या उंच शिखरांवर बर्फ टिकून राहतो, जिथे तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यातही येथील तापमान 15 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते.

रोहतांग पास

हिवाळ्यात लोकं हिमवृष्टी पाहण्यासाठी शिमला, कुल्लू आणि मनालीला गर्दी करतात, पण जर तुम्हाला उन्हाळ्यात बर्फ पाहायचा असेल, तर तुम्ही मनालीजवळच्या रोहतांगला जाऊ शकता. हे उंच ठिकाण उन्हाळ्यातही बर्फाने झाकलेले असते. येथे तुम्ही स्नो स्कूटरिंगपासून ते स्कीइंग आणि हिमवृष्टीपर्यंत सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

युमथांग व्हॅली एक्सप्लोर करा

भारतातील सिक्कीम राज्यात गंगटोकपासून सुमारे 124 किलोमीटर अंतरावर असलेले युमथांग व्हॅली हे एक असे ठिकाण आहे, जिथे उन्हाळ्यातही बर्फ पाहायला मिळतो. ‘फुलांची दरी’ म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणच्या ‘झिरो पॉइंट’वर वर्षभर बर्फ असते. या ठिकाणी भेट देण्यासाठी परमिट असणे आवश्यक आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in