• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओव्हर-सेक्सुअलाइज्ड…, इज्जत तर मिळतच नाही, कंगना राणौत यांचं लक्षवेधी वक्तव्य, असं म्हणाल्या तरी का?

June 8, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी आपल्या समाजात नर्स क्षेत्राबद्दल असलेल्या मानसिकतेवर निशाणा साधला आहे. आगामी ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान कंगना यांनी पुन्हा स्वतःचं परखत मत केलं. ‘नर्स आपल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त काम करतात. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, समाजात या कामाकडे अनेकदा लैंगिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नर्स यांना मानधन देखील सर्वात कमी मिळतं. तर त्यांच्याकडून सर्वात जास्त काम करुन घेतलं जातं. या बदल्यात त्यांना जो सन्मान आणि आदर मिळायला पाहिजे, तो कधीच मिळत नाही.’, असं कंगना राणौत म्हणाल्या.

एवढंच नाही तर, सिनेमातील एका डायलॉगचं उदाहरण देत कंगना राणौत म्हणाल्या, रुग्णालयांमध्ये एखाद्या नर्सला पाहिल्यावर लोक वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी उगाच गप्पा मारण्याचा प्रयत्न करतात, जे समाजातील उथळ आणि कठोर वास्तव दर्शवतं. कंगना यांच्या मते, जेव्हा जेव्हा रुग्णालयांचा उल्लेख होतो, तेव्हा लोक फक्त डॉक्टरांच्या योगदानाबद्दल बोलतात, पण रुग्णसेवेपासून ते रुग्णालयाच्या स्वच्छतेपर्यंत आणि संपूर्ण व्यवस्थेचा खरा कणा म्हणजे नर्स, वॉर्ड बॉय आणि वॉचमनसारखे सहाय्यक कर्मचारी आहेत, ज्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.., असं कंगना म्हणाल्या.

कंगना असं देखील म्हणाल्या की, सिनेमामुळे अनेकांच्या विचारांमध्ये बदल होतील. त्यांना (नर्स) देखील आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे. ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमा 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात कंगना यांच्यासोबत अभिनेत्री गिरीजा ओक हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘भारत भाग्य विधाता’

‘भारत भाग्य विधाता’ सिनेमाची कथा 26/11 च्या भयानक दहशतवादी हल्ल्यादरम्यान, कामा रुग्णालयातील धाडसी कर्मचाऱ्यांभोवती फिरत आहे. सिनेमात कंगना यांनी स्वतः एका नर्सची भूमिका साकारली आहे. ज्यांच्या मेहनतीकडे कायम कानाडोळा केला जातो. या सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, एका दहशतवादी हल्ल्यादरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी 400 हून अधिक निरपराध लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घातला.

कंगना यांनी खुलासा केला आहे की, कामा हॉस्पिटलचे हे शूर कर्मचारी दहशतवादी अजमल कसाबला ओळखण्यात महत्त्वाचे साक्षीदार होते. सर्व प्रकारच्या त्रासांना तोंड देऊनही, या कर्मचाऱ्यांनी विलक्षण धैर्य दाखवलं आणि ते राष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in