• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडताच ठाकरेंच्या शिवसेनेला पहिला मोठा धक्का, थेट धाराशिवच्या..

June 19, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटाला राम राम करून थेट 6 खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार आहेत. काल दिल्लीमध्ये याबाबतच्या अनेक घडामोडीही घडताना दिसल्या. थेट लोकसभा अध्यक्षांना या खासदारांनी पत्र लिहिले. स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटाला खासदार फुटीची भनक लागताच त्यांनी तात्काळ पक्षाकडून सर्व खासदारांना व्हिप जारी केले आणि बैठक बोलावली. मात्र, पक्षाच्या व्हिपला देखील दाद न देता हे खासदार उपस्थित राहिली नाही. त्यामुळे स्पष्ट झाले की, शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाला हा दुसऱ्यांदा मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी दिली. या सर्व खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती मिळतंय. यादरम्यानच या 6 खासदारांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील ठाकरे गटाला सोडून थेट शिवसेना शिंदे गटात सामील होणार आहेत. लोकसभेच्या अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आहे. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून जात असल्याने एकच खळबळ उडाली. ओमराजे निंबाळकर यांनी यावर काहीच भाष्य केले नाही, त्यांनी म्हटले की, 20 जून रोजी मी यावर स्पष्ट बोलेल, आता नाही.

पक्षाने व्हिप जारी करूनही ओमराजे निंबाळकर बैठकीला उपस्थित नव्हते. ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाला सोडून जात असल्याने मोठे खिंडार धाराशिवमध्ये पडल्याचे दिसतंय. त्यामध्येच आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाकडे धाराशिवच्या शिवसैनिकांची पाठ फिरवल्याचे चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईतील वर्धापन दिन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटात असताना मोठ्या संख्येने धाराशिवचे शिवसैनिक या मेळाव्याकरिता जात.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणारे शिवसैनिक यंदा तुलनेने फार कमी आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील कार्यकर्ते दिशाहीन झाल्याचे दिसत आहेत. 20 जून रोजी ओमराजे निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही यंदा मुंबईतील मेळाव्याकडे जाणे टाळले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
  • 8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
  • अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
  • Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर
  • मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in