• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका, ती चूक पडतंय महागात, थेट 20 हजार..

June 20, 2026 by admin Leave a Comment


ओमराजे निंबाळकर यांच्यासह तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्रही दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दरम्यान लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. संजय ऊर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर संजय दिना पाटील यांच्यासारख्या खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचे आणि पक्षाचे पाठबळ मिळत नसल्याचे कारणे यांनी दिली. काल ओमराजे निंबाळकर यांनी थेट आपल्या मनातील खदखद बोलूनही दाखवली. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण आणि सर्वकाही सांगितले. शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी 6 खासदारांनी केली. पण खरी चर्चा ही फक्त ओमराजे निंबाळकर यांच्याच नावाची रंगताना दिसत आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणे अनेकांना पचले नसल्याचे दिसंतय. ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना झटका बसताना दिसत आहे. सतत त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येत घट दिसत आहे.

तीन दिवसात 20 हजार फॉलोवर्सने खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. तीन दिवसांपासून सोशल मीडियावरती खासदार निंबाळकर यांना अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरूच आहे. लोक आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनफॉलोवरची संख्या 3 दिवसात 20 हजारावर गेली.

खासदार ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावरती सक्रिय असलेले खासदार आहेत. त्यांच्या अनेक रिल्सही व्हायरल होतात. पक्षांतराच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंटलाही सामोरे जावे लागत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी कालच पहिल्यां ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये आणि का हा निर्णय घ्यावा लागला, हे त्यांनी सांगितले. निधीचा अभाव, पक्षाचे नसलेले पाठबळ यावर बोलताना ओमराजे निंबाळकर दिसले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले…
  • गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
  • नवीन गाड्यांमधील ‘हे’ 4 सीक्रेट फीचर्स प्रवासाला बनवतील सुरक्षित अन् सोपे; तुम्हाला माहीत आहेत का?
  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in