• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर अभिषेक बच्चन याचा मोठा खुलासा, आमचे एकमेकांचे..

April 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असलेले नाव आहे. अभिषेक बच्चन आणि आणि ऐश्वर्या राय यांनी 2007 मध्ये लग्न केले. काही दिवस दोघांनी एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अभिषेक कायमच ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या नात्यावर बोलताना दिसतो. काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा होती की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेणार आहेत. मात्र, त्यावेळी बच्चन कुटुंबापैकी कोणीही भाष्य केले नाही. नुकताच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. अभिषेक बच्चन याने नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. चित्रपटाच्या सेटवरून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्य लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. दोघे एकमेकांच्या छान मित्र होते. दोघांनीही विचार केला नव्हता की, त्यांचे नाते इथपर्यंत येईल.

डेक्कन क्रॉनिकलला बोलताना अभिषेक बच्चन याने म्हटले की, माझी आणि ऐश्वर्याची पहिली भेट 2000 मध्ये ढाई अक्षर प्रेम के सेटवर झाली. त्यावेळी आमच्यात फक्त मैत्रीचे नाते होते. आमच्या दोघांचे एकमेकांसोबत खूप जास्त चांगले जमायचे. त्यावेळी ऐश्वर्या माझी आयुष्यभराची जोडीदार असेल असा विचारही केला नव्हता. उमराव जान चित्रपटाच्या शूटिंगवेळी आम्ही न्यूयॉर्कमध्ये होतो, त्यावेळी मी ऐश्वर्याला प्रपोज केला.

यावेळी आपल्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे सिक्रेट सांगताना अभिषेक बच्चन म्हणाला की, दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीला न विसरता तीन वेळा सॉरी बोला..  अभिषेक बच्चनही तेच करत असल्याचे बोलले जाते. ऐश्वर्या राय हिने लग्नानंतरही चित्रपटात काम सुरू ठेवले. ऐश्वर्याने तिच्या कामावर लक्ष द्यावे, ही माझी कायम इच्छा राहिल्याचे अभिषेक बच्चन याने म्हटले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. मात्र, दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे कळताच चाहते तणावात होते. त्यानंतर काही महिन्यांनंतर अभिषेक बच्चन याने यावर भाष्य करत अफवा असल्याचे स्पष्ट केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी आहे. कायमच ऐश्वर्या राय मुलीसोबत विमानतळावर स्पॉट होताना दिसते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! इराणकडून भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, अख्खी टीमच संपवली, एकही शिल्लक राहिला नाही
  • Central Railway Recruitment: खळखट्याकपूर्वीच मध्य रेल्वे ताळ्यावर, अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना मोठे यश, मराठीविषयी घेतला मोठा निर्णय
  • 32 वर्षांचा जुना चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम
  • Sanjay Raut Press | जनआक्रोश मोर्च्यावरून वाद चिघळला; स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
  • मोठी बातमी! 2029 च्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला? रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in