• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एलपीजी गॅस सिलेंडर 300 रुपयांनी मिळवा स्वस्त, थेट असा करा अर्ज, तब्बल 10 कोटीपेक्षाही..

June 4, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. सतत एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. जर तुम्हाला घरगुती एलपीजी गॅस तब्बल 300 रूपयांनी स्वस्त हवा असेल तर तो मिळू शकतो. देशात एलपीजीचे दर कितीही वाढले तरीही तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. घरगुती गॅस सिलेंडर सध्या असलेल्या किमतीपेक्षा तब्बल 300 रूपयांनी स्वस्त मिळेल. उज्ज्वला गॅस योजनेच्या खाली तुम्हाला ही सबसिडी मिळेल. उहादरणार्थ 14 किलोचे घरगुती गॅस सिलेंडर तुम्हाला फक्त 613 मध्येच मिळेल. सध्या एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किमत आहे, त्यापैकी 300 रूपये कमी होऊ तुम्हाला ते सिलेंडर मिळेल. सामान्य लोकांना जे सिलेंडर 913 रूपयांना मिळते ते तुम्हाला फक्त 613 मध्ये मिळेल. देशभरात सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडासा फरक असतो. तुमच्या शहरात सिलेंडरची जी किमत आहे, त्यातून 300 रूपये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून कमी होतील.

सरकारकडून ही सबसिडी दिली जाते. देशभरातील 10.55 करोड महिलांना मार्केटच्या भावापेक्षा 300 रूपयांनी स्वस्त गॅस मिळत आहे. सरकारी आकड्यांनुसार, देशात जवळपास 33 करोड ग्राहक एलपीजीचे आहेत. मात्र, एलपीजी सिलेंडरवरील उज्ज्वला सबसिडी योजनेमुळे ऑयल मार्केटिंग कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या वर्षी कंपन्यांना 41338 करोडचे नुकसान सहन करावे लागले होते. जे आता वाढून 60000 होऊ शकते.

सरकारने हे नुकसान भरून काढण्याकरिता 30000 रक्कम दिली आहे. जर तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल आणि 300 रूपयांनी स्वस्त एलपीजी गॅस सिलेंडर घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळील गॅस वितरण कंपनीला भेट द्यावी लागेल. उज्ज्वला योजनेचा लाभार्थी होण्याकरिता 18 पेक्षा अधिक वय असावे आणि गरीब महिला असली पाहिजे.

हेच नाही तर कुटुंबात यापूर्वी एलपीजी गॅसचे कनेक्शन नसावे. राशन कार्ड, आधार कार्ड, बॅंक खात्याची माहिती महिलांना द्यावी लागेल. याबाबतचे कागदपत्रे द्यावी लागतील. विशेष म्हणजे महिलांना कोणतेही पैसे न भरता गॅस कनेक्शन दिले जात. पहिले भरलेले सिलेंडरही मोफतमध्ये दिले जाते. केवायसी फॉर्म, आधार कार्ड, ओळख प्रमाणपत्र, राशन कार्ड, कुटुंबातील सदस्यांची माहिती, पासबुक दिल्यानंतर आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Girija Oak : गिरिजाला सर्वकाही संपल्यासारखं वाटलं तेव्हा…, आई झाल्यानंतर अभिनेत्रीला बसलेला मोठा धक्का, पहिल्यांदाच म्हणाली…
  • ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदेंचे थेट आदेश..
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे..सगळे रात्रीचे खेळ..आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणारे शब्द
  • पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्… पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता…
  • किसिंग सीन दरम्यान 20 वेळा रिटेक, रागात नंतर अभिनेत्रीने जे केलं ते ऐकून व्हाल थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in