• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एलपीजी गॅसच्या किमतीत तब्बल 993 रूपयांनी मोठी वाढ, थेट 5 किलोच्या गॅसच्या किमतीही..

May 1, 2026 by admin Leave a Comment


एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये देशभरात मोठी वाढ करण्यात आली. पश्चिम बंगाल आणि आसाम यासह अन्य राज्यांच्या निवडणुका होताच सरकारकडून सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली. फक्त कमर्शियलच नाही तर 5 किलोच्या सिलेंडरच्याही किमतीमध्ये वाढ करण्यात आली. कमर्शियल सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रूपयांनी वाढ करण्यात आली तर 5 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये 261 रूपयांनी वाढ करण्यात आली. हा मोठा धक्का सर्वसामान्य लोकांना असणार आहे. सरकारकडून वाढवण्यात आलेल्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे कमर्शियल एलपीजी गॅसचे सिलेंडर 3000 हजारांच्या पुढे गेले. भारतीय तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या सिलेंडच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ केली नाही. मात्र, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत केलेल्या वाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार.

हॉटेल आणि रेस्टोरेंट चालक पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ करू शकतात. शेवटी त्याचा फटका लोकांनाच बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होताच सरकारने मोठा दणका देत सिलेंडरच्या किमतीत थेट 993 रूपयांनी मोठी वाढ केली. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसचे अत्यंत मोठे संकट आहे.

एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. होर्मुज खाडी ठप्प आहे. सरकारने गॅसच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता 1 मे पासून थेट मोठ्या किमती वाढवल्या आहेत. किमतीही थेट 993 रूपयांनी वाढवली आहे.  होर्मुज खाडी बंद आहे. शिवाय भारत कतारकडून मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची आयात करतो. मात्र, इराण अमेरिका युद्धात इराणकडून कतारच्या गॅस प्रकल्पावर हल्ला करण्यात आला.

ज्यामुळे त्यांनी उत्पादन कमी केले. एलपीजीचा तुटवडा आहे. शिवाय होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात गॅस आयात करण्यासाठी खर्च अधिक वाढला. त्यानंतर आता भारतीय तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अजूनही थांबले नाहीये. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हे युद्ध सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Summer Health Tips : उन्हाळी लागली, नाकातून रक्त येतंय ? हे उपाय ठरतील फायदेशीर
  • इराण अमेरिका युद्धात हा देश उतरण्याची शक्यता, जगात हाहाकार, इराणचा भडका, थेट..
  • OTT वरील ही जबरदस्त सीरिज पाहून येईल मजा…6 भागांत दिसेल युनिक सुपरनॅचरल लव्ह स्टोरी
  • तामिळनाडू ते केरळम…पुद्दुचेरी ते आसाम, कोण राखणार गड, कोणाचा होणार दारून पराभव, या एक्झिट पोलचा दावा काय?
  • Raja Shivaji : ‘या’ चित्रपटगृहांमध्ये ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहा मोफत, आताच पाहा संपूर्ण यादी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in