• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

July 17, 2026 by admin Leave a Comment


मिस्ड कॉल्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते पण एका भारतीय वंशाच्या इंजिनिअरने मिस्ड कॉल्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि 1 अब्ज डॉलर्सचा स्टार्टअप उभा केला. एक मिस्ड कॉलसुद्धा किती उपयुक्त ठरेल हे अपूर्व श्रीवास्तव यांनी करुन दाखवलं. त्यांनी या विचाराला एका मोठ्या कल्पनेत रूपांतरित केले आणि ‘अवोका’ या स्टार्टअपची स्थापना केली.  अपूर्व श्रीवास्तव यांनी त्यांचे बालपण अमेरिकेतील मिशिगनमध्ये घालवले. येथे, ते त्यांच्या कुटुंबाला आणि परिसरातील लहान व्यवसायांना फोन कॉल्सना उत्तर देण्यास मदत करत असत. याच काळात त्यांच्या लक्षात एक साधी पण महत्त्वपूर्ण गोष्ट आली: एसी, प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकल कामासारख्या होम सर्विस व्यवसायात कॉल चुकणे म्हणजे थेट आर्थिक नुकसान होय. याच विचाराने ‘अवोका’चा पाया घातला.

शिक्षण आणि तांत्रिक पार्श्वभूमी
अपूर्व श्रीवास्तव यांनी MIT मध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. अभ्यासासोबतच, त्यांनी AI वर काम केले आणि त्यातील अभ्यासक्रमांची तयारी केली. त्यानंतर त्यांनी ॲपल आणि गुगलमध्ये इंटर्न म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सनशाईन आणि रिटूल सारख्या कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून काम केले. तिथेच त्यांच्या लक्षात आले की, एआयचा वापर केवळ पुस्तकांविषयी बोलण्यापुरता मर्यादित न राहता, वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी केला पाहिजे.

अपूर्व एमआयटीमध्ये शिकत असताना, त्यांची टायसन चेनशी मैत्री झाली. दोघांनी मिळून एकAi तयार केले, जे रेस्टॉरंटमधील फोन कॉल्सना आपोआप उत्तर देत असे. सुरुवातीला, त्यांचे लक्ष रेस्टॉरंट्सवर होते. पण 2023 मध्ये, त्यांची टेक्सासमधील HVAC कंपनी असलेल्या रेस्क्यू एअरशी भेट झाली. यामुळे त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला. त्यांच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली ती म्हणजे रेस्टॉरंटमध्ये एक फोन कॉल चुकल्यास केवळ सुमारे 40 डॉलर्सचे नुकसान होते. मात्र,  HVAC किंवा होम सर्विसमध्ये एक फोन कॉल चुकल्यास 30,000 ते 40,000 डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. याचा अर्थ असा की, होम सर्विसमधील फोन कॉल खूपच महाग असतो. इथेच त्यांना स्पष्टपणे दिसले की खरी संधी रेस्टॉरंट्समध्ये नसून होम सर्विसच्या बाजारपेठेत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in