
भारताने मास्टर प्लान तयार केला. भारताच्या या मास्टर प्लानने चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची झोप उडाली. भारताने आपल्या सीमा अधिक सुरक्षा आणि मजबूत करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले. ज्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांचे आयुष्य बदलेल. ज्यामुळे सीमा भागात रणगाडे आणि तोफा अधिक जास्त प्रमाणात आणि अगदी सहजपणे तैनात करणे शक्य होईल. चीन, पाकिस्तान, बांगलादेशला लागून असलेल्या संवेदनशिल सीमावर्ती भागात रेल्वे जाळे अधिक बळकट करण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले. ज्याकरिता भारत तब्बल 45 कोटी खर्च करणार आहे. सीमावर्तीय भागात रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत केले जाईल. पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम या भागात भारत रेल्वे लाईनचे काम करण्याच्या तयारीत आहे.
रेल्वे लाईन, प्लेटफॉर्म आणि आधुनिक नेटवर्क उभे केले जाईल. भारत एकाच दगडात तीन पक्षी मारत आहे. दुर्गम भागात कोणत्याही अडथळ्याशिवाय भारत शस्त्रे आरामात पाठू शकणार आहे. यामुळे पर्यटन, रोजगार आणि व्यापार यांच्या वाढीसाठी मदत होईल. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यात आणि भारतात अतिसंवेदनशिल भाग आहे. चीनसोबत एलएसी तणाव आहे.
पाकिस्तान आणि भारतात कायमच तणाव राहिला आहे. 2024 नंतर भारत आणि बांगलादेशाचेही संबंध तणावात आहेत. भारताकडून सीमा भागात रेल्वे नेटवर्क उभारले जात असल्याने या तिन्ही देशांच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही. भारत हे रेल्वे नेटवर्क उभारत मोठा संदेश देत आहे. भारताकडून तब्बल 1700 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकली जाईल.
सीमावर्तीय भागात रेल्वे नेटवर्क उभारल्याने भारतीय ताकद वाढणार आहे. काही असे दुर्गम भाग आहेत, जिथे शस्त्र पाठवणे म्हणजे मोठे कठीण काम आहे. पण आता भारत तिथेच रेल्वे नेटवर्क उभे करत आहे. ज्यामुळे हे शस्त्र पाठवण्यासाठी लागणारा वेळ, खर्च सर्वच काही कमी होऊ शकतो. यासोबतच रेल्वेचे नेटवर्क उभारल्याने सीमावर्तीय भागातील नागरिकांना मोठा आधार होईल. तशी पाऊले भारताकडून उचलली जात आहेत.
Leave a Reply