• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका डॉक्टरची औषधांची चिठ्ठी देशभर का झाली व्हायरल? इतकं काय खास? वाचा

August 19, 2026 by admin Leave a Comment


डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर वाचणं म्हणजे डोकेदुखी वाढवण्याचं काम असतं. कारण त्यावरील औषधं नेमकी कशासाठी, कोणत्या कंपनीची हे काही रुग्णाला कळत नाही. सरावानं मेडिकल स्टोरमधील व्यक्तीला ते माहिती असतं. तो त्या गोळ्या, सिरप रुग्णाला देतो. त्यानंतर डॉक्टर त्याचं डोस कसा घ्यायचा याची माहिती देतो. पण उत्तर प्रदेशातील एका डॉक्टरांची कथित औषधाची चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता ही खरंच डॉक्टरांचीच चिठ्ठी आहे की, एआयने निर्मिती केलेले प्रिस्क्रिप्शन हे समोर आलेले नाही. पण रुग्णाला जर अशा पद्धतीचे प्रिस्क्रिप्शन मिळाले तर त्यांनाही औषधांची तोंडओळख होईल हे ही तितकेच खरं.

सुबक, वळणदार अक्षरानं जिंकली मनं

बरेली येथील डॉ. रियासत अली या नावाने हे प्रिस्क्रिप्शन आहे. त्यावर रिअल हेल्थ केअर सेंटर असे दवाखान्याचे नाव आहे. पण हे प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर मोत्यासारखं आहे. सुबक, वळणदार अक्षर पाहून रुग्णाला आनंदाश्रूच येतील. तो आनंदाने गदगद होईल. या चिठ्ठीवरील अक्षर स्वच्छ, सुबक आणि स्पष्ट आहे. हे अक्षर पाहून अनेकांनी कौतुकाचे पूल बांधले आहेत. नाहीतर प्रिस्क्रिप्शनवरील घाणेरडे आणि एकमेकांच्या पायात पाय असलेले अक्षर पाहून रुग्ण अजून आजारी पडतो. पण हे अक्षर टोपरे आणि सुटसुटीत, वाचनीय आहे.

या प्रिस्क्रिप्शनमध्ये काय काय?

या प्रिस्क्रिप्शनमध्ये रुग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता आणि त्याच्या आजाराची लक्षणे देण्यात आली आहे. त्यावर कोणती औषध लिहून दिली आहेत, त्याची माहिती देण्यात आली आहेत. कोणत्या आजारपणासाठी कोणते औषध घ्यायचे याची व्यवस्थित माहिती या प्रिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. जसे की, ताप आणि अंगदुखीसाठी पॅरासिटामॉल, संसर्गजन्य आजारासाठी सेफिमिक्सम, खोकला आणि सर्दीवरील औषध, ॲसिडिटी, अपचनावरील औषधाचाही उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे.

वाकई आज के वक्त में ऐसे डॉक्टरों की मौजूदगी काबिले तारीफ़ है?
अगर किसी ने इतनी साफ़ राइटिंग में कोई दवा का पर्चा कहीं देखा है तो बताइए? pic.twitter.com/2NX9XvwIur

— Anis Ahmad (@Ansari5k) August 19, 2026

प्रत्येक औषधासमोर ते किती प्रमाणात घ्यायचे, कधी घ्यायचे, याचे सप्रमाण आणि वेळ नोंदवण्यात आली आहे. औषधांचा डोस स्पष्ट लिहिण्यात आला आहे. सकाळी आणि रात्रीच्या औषधांची फोड करण्यात आली आहे. त्याची मात्रा स्पष्ट करण्यात आली आहे. अत्यंत सफाईदारपणे आणि सविस्तरपणे हे मांडण्यात आले आहे. यामुळे रुग्णाला कोणते औषध हे कोणत्या आजारपणासाठी देण्यात आले आहेत. याची माहिती मिळते. त्याची एकप्रकारे प्रिस्क्रिप्शन कार्यशाळाच या निमित्ताने झाली आहे. त्याची औषधांविषयीची जागरुकता वाढली आहे. एकप्रकारे त्याची औषधी साक्षरता झाल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये. या प्रिस्क्रिप्शनच्या खाली तळटीप देण्यात आली आहे. त्यातील सूचना रुग्णांसाठी मार्गदर्शिकाच आहेत. त्यांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. अधिक पाणी प्यावे. आजारपणात तेलकट, तुपकट खाण्याऐवजी हलका आहारावर भर द्यावा असा सल्ला देण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हा केवळ माहितीपर लेख आहे. यातील दाव्याची, औषधांची पुष्टी टीव्ही ९ मराठी करत नाही.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in