• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका छताखाली राहतात 6 सासवा, 14 सूना, कुटुंबात एकूण 83 सदस्य, नागप्पा फॅमिलीची हैराण करुन सोडणारी गोष्ट

August 19, 2026 by admin Leave a Comment


आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर अनेक कुटुंब स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल 83 सदस्य असून सहा पिढ्या एकत्र राहतात. या कुटुंबामध्ये 6 सासू, 14 सुना आणि 20 मुलं व इतर वडीलधारी मंडळी आहे.

नागप्पा कुटुंबातील सदस्य एकमेकांना लागून असलेल्या चार घरांमध्ये राहत असले, तरी त्यांच्या नात्यांमध्ये कोणतेही अंतर नाही. हे संपूर्ण कुटुंब स्वतःला एकच घटक मानते. या घरामध्ये जेवण एकत्र बनवले जाते, घरखर्च वाटून घेतला जातो आणि घरकामापासून शेतीपर्यंतच्या जबाबदाऱ्या सर्वजण मिळून पार पाडतात. तसेच घरातील वडीलधारी मंडळी अनेक महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतात.

दररोज सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून दिवसाचा कामकाज ठरवतात

कुटुंबाचे प्रमुख हनुमंतरायडू यांच्या म्हणण्यानुसार, घरातील वडीलधारी मंडळी दररोज सकाळी चहा-कॉफी घेत एकत्र बसतात. तेव्हा त्यावेळी दिवसातील कामे, जेवणाचे पदार्थ आणि शेतीची कामे ठरवली जातात. काही सदस्य शेतात काम करतात, तर महिला घरातील स्वयंपाक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळतात.

नागप्पा कुटुंबाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांच्या ऐवढ्या मोठ्या घरात असलेलं एकच स्वयंपाकघर. या घरातील सुना मिळून स्वयंपाक करतात, तर वडीलधारी मंडळी किराणा आणि आवश्यक वस्तू आणून देण्याचं काम करतात. तर या कुटुंबाचे उत्पन्न हे शेती व्यवसाय आणि वाहतूक व्यवसायातून मिळते. एवढेच नाहीतर कुटुंबाकडे श्री कृष्ण हनुमान ट्रॅव्हल्सच्या बसगाड्या आहेत, ज्या कल्याणदुर्गम आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये धावतात.

घरातील मतभेद, भांडणं त्याचं दिवशी एकत्र बसून चर्चा करून सोडवली जातात

मतभेद प्रत्येक मोठ्या कुटुंबात होतात, पण नागप्पा कुटुंबातील सदस्य दिवस संपण्यापूर्वी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. आदर, सहकार्य आणि जबाबदारीची भावना हीच त्यांच्या एकतेची खरी ताकद आहे.

चौथी पिढी सांभाळते कुटुबांची जबाबदारी

कुटुंबातील चौथ्या पिढीतील महेश यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. ते किराणा सामान, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, वाहनांची देखभाल आणि बँकेची कामे पाहतात. नागप्पा कुटुंबाची आर्थिक ताकद शेतीवर आधारित आहे. या कुटुंबाकडे सुमारे 120 एकर शेतजमीन आहे, ज्यावर भुईमूग, टोमॅटो, वांगी, टरबूज, पपई आणि मिरची यांसारखी पिकांची लागवड केली जाते. याशिवाय त्यांच्याकडे अंदाजे 1000 मेंढ्या, 70 म्हशी, तीन ट्रॅक्टर, एक बोलेरो आणि एक आयशर ट्रक आहेत.

या कुटुंबात आजही पारंपरिक पद्धतीने मातीच्या चुलींवर स्वयंपाक केला जातो. रोजच्या जेवणात नाचणीची संगटी (हा दक्षिण भारतातील एक पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहे.) आणि ज्वारीच्या पोळ्या असतात. सण-समारंभाच्या वेळी संपूर्ण कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जातो. नागप्पा कुटुंबाचा हा एकत्र संसार आजच्या काळात प्रेम, विश्वास आणि कौटुंबिक एकतेचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in