• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका गावचा मुलगा, दुसऱ्या गावची मुलगी,जंगलात भेटले, लोकांनी पकडलं आणि थेट….

August 17, 2026 by admin Leave a Comment


आयुष्य सुरळीत सुरू असताना कधी काय होईल, हे कधीच सांगता नाही. त्यात तुम्ही समाजातील पारंपरिक प्रथेच्या विरोधात एखादं पाऊल उचललं. तर समाजातील लोकच शिक्षा द्यायला मागे पुढे येतात. देशातील विविध भागात शिक्षा देण्याची प्रथा सुरू आहे. झारखंडच्या एका तरुणासोबतही एक धक्कादायक प्रकार घडलाय. दुसऱ्या गावात असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचं लोकांनी लग्नच लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

तरुणाने गर्लफ्रेंडची अनेक दिवस भेट घेतली नव्हती. त्यामुळे तरुण बाजूच्या गावात राहणार्‍या गर्लफ्रेंडला भेटायला गेला. बॉयफ्रेंडनं त्याच्या गर्लफ्रेंडला गावातून थेट जंगलात घेऊन गेला. अनेक दिवसांनी भेटलेले जोडपे आनंदाने एकमेकांशी गप्पा मारण्यात गुंग होते. दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. दोघेही भविष्यातील निर्णयाविषयी चर्चा करत होते. त्याचदरम्यान दोघांवर गावकऱ्यांची नजर पडली. गावातील लोकांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. चेहरा साधा भोळा असणाऱ्या मुलाचं गावकऱ्यांनी थेट त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. लग्न लावून देताना संपूर्ण गाव जमा झालं होतं. गावातील लोकांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न लावण्यात आलं. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. दोघांच्या लग्न लावून दिल्यानंतर काहींनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.

 

मासूम से दिखने वाला लड़का अपनी गर्लफ्रेंड्स से मिलने गया था लेकिन गाँव वालो ने पकड़ कर शादी कर दिया।

सोशल मीडिया पर वीडियो वायरल है
लड़का अपनी गर्लफ्रेडंस से मिलने उसके गाँव गया था गाँव वालो ने पकड़ कर दोनों की शादी कर दी।
वीडियो झारखण्ड से है लड़का अपने पड़ोस के गाँव की लड़की… pic.twitter.com/ASH7W6uP1o

— Mohd. Arif (@MohdArif396) August 17, 2026

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

दिवसाढवळ्या प्रेमीयुगुल लपून छपून एकमेकांना भेटत होते. शेजारच्या गावातील तरुण पहाटेच्या सुमाराच गर्लफ्रेंडला भेटायला आला होता. त्याने गर्लफ्रेंडला थेट जंगलात घेऊन गेला. दोघांच्या लपून छपून भेटीवर गावकऱ्यांची नजर पडली. दोघांच्या प्रेम प्रकरणावर गावकरी भडकले. गावकऱ्यांनी थेट दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोघांच्या हातात वरमाला दिल्या. त्यानंतर दोघांना एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालण्यास सांगितलं. दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्यानंतर बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंड्या भांगेत कुंकू भरण्यास सांगितलं. दोघांचं लग्न लावून दिल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी दोघांचे फोटो काढले. लग्न झाल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु बॉयफ्रेंडच्या चेहऱ्यावरील नाराजी दिसत होती. दोघांच्या लग्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in