• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकदम सिंपल फ्रॉकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आहे टॉपची अभिनेत्री, अनेकजण ओळखण्यात ठरले फेल

August 23, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे बालपणीचे काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा अगदी साध्या फ्रॉकमध्ये दिसत असून, तिच्यासोबत तिची लहान बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीही दिसत आहे.

या जुन्या फोटोंमधील शिल्पाला आजच्या लूकवरून ओळखणंही अनेकांसाठी कठीण होत आहे. शिल्पा शेट्टीने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे जुने फोटो शेअर केले आहेत. अॅनिमल प्रिंटवर आधारित खास कलेक्शनच्या निमित्ताने तिने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले.

फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या अभिनयाच्या जोरावर 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

आपल्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची आणि फिटनेसचीही कायम चर्चा होत असते. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने करताना दिसते.

शिल्पा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती वेळोवेळी वर्कआउटचे व्हिडीओ, योगासने आणि फिटनेसशी संबंधित टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिचा फिटनेस आणि लाइफस्टाइल आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in