
बदलत्या जीवनशैलीत जेव्हा हेल्दी डाएटचा विचार केला जातो. तेव्हा अनेकजण मखाने खाण्याचा विचार करतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून मखाने खूप लोकप्रिय झालेले आहेत. मखाना हा एक सुपरफूड आहे. कारण त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे असतात. भारतात आपल्यापैकी अनेकजण् तुपात मखाना भाजून खातात. तर काही जण विविध फ्लेवर असलेले मखाने खाण्याचा आनंद घेतात. तर आहारात मखाना खाण्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे त्याचे पौष्टिक मूल्य आणि त्याची उत्कृष्ट चव. मात्र उन्हाळ्यात तूप आणि विविध मसाल्यांसोबत भाजून खाल्याने शरीरासाठी थोडे धोकादायक ठरू शकते. खरे तर तूप आणि मसाले पोटात उष्णता निर्माण करतात आणि पचनसंस्थेला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हलके आणि सहज पचणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात एक-दोन वाट्या भाजलेले मखाने खाता का? या लेखात आपण उन्हाळ्याला साजेशी अशी मखाने खाण्याची पद्धत जाणून घेऊयात.
उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन ठरते उत्तम
उष्णतेच्या लाटेत किंवा गरम हवामानात पोट लवकर गरम होते. त्यामुळे पोटाला नैसर्गिकरित्या थंडावा देणारे पदार्थ सेवन करावे. पोट थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात बेलफळ, सत्तू आणि काकडी यांसारखे पदार्थ भरपूर प्रमाणात खावेत. याव्यतिरिक्त, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. इतकेच नाही तर फायबरयुक्त पदार्थ आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध तसेच उच्च पाणी असलेले पदार्थ खावेत.
उन्हाळ्यात मखाना कसा खावा?
मखाना चाट
आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ सांगतात की मखाना एक सुपरफूड आहे. त्यात फायबर, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. मात्र तुम्ही जर ते भाजून खात असाल, तर त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील पाणी कमी होऊ शकते. तज्ञ उन्हाळ्यात मखाना चाट खाण्याची शिफारस करतात. जसे की काकडी, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून त्यात मखाने मिक्स करा आणि या चाटचे सेवन करा. तसेच जास्त मखाना खाल्ल्याने ते जड वाटू शकते, म्हणून भाज्यांचा समावेश करून ते संतुलित करा. अशा प्रकारे मखाने खाल्याने तुम्हाला अधिक पोषक तत्वांसह दुप्पट फायदे मिळतात.
मखाना रायता
उन्हाळ्यात मखाना हा दह्यासोबत खाणे सर्वोत्तम ठरते. तर हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. दह्याचा थंडावा देणारा गुणधर्म आणि मखान्याची शक्ती शरीराला आतून अविश्वसनीय ऊर्जा देऊ शकते. दह्यामध्ये कॅल्शियम असते आणि मखान्यातही अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे आपले स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी हे एक उत्कृष्ट मिश्रण आहे. मखाना तुपात भाजून घ्या आणि नंतर फेटलेल्या दह्यात मिक्स करून खा. पोट थंड ठेवण्यासाठी इच्छित असल्यास तुम्ही त्यात पुदिना देखील मिक्स करू शकता. मखाना रायता हा उन्हाळ्यातील जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे.
मखाना स्मूदी
उन्हाळ्यात पोट थंड ठेवण्यासाठी तुम्ही मखाना स्मूदी सुद्धा बनवू शकता. यासाठी मखान्याची पूड करून ती ताकात भिजवा. आणि हे मिश्रण रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे लागेल. दुपारच्या जेवणाच्या वेळेत हे पेय प्या. हे एक असे सुपर ड्रिंक आहे जे कडक उन्हातही तुमचे पोट थंड ठेवू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply