
गेले १७ वर्षांपासून कल्याण सत्र न्यायालयात सुरू असलेल्या दिवंगत नेते वसन्त डावखरे मानहानी खटल्याचा अंतिम निकाल २३ सप्टेंबर रोजी लागणार आहे. २००९ मध्ये एका सभेत कथित सीडी वाजवून बदनामी केल्याच्या आरोपाखाली वसन्त डावखरे यांनी उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि अन्य दोन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये २० पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे, तर दोन तपास अधिकाऱ्यांचीही साक्ष तपासण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचाही ३१३ प्रमाणे व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा निकाल आज, सुरुवातीला अपेक्षित होता, मात्र न्यायालयाच्या कामकाजामुळे तो २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी कथित सीडीचा अहवाल विसंगत असल्याचे आणि प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे युक्तिवाद केले आहेत. आता २३ सप्टेंबर रोजी कल्याण सत्र न्यायालय ठाकरे-शिंदेंना दिलासा देणार की शिक्षा सुनावणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
Leave a Reply