• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उंची कमी असल्याने हरलो..! माजी कर्णधाराने पाकिस्तानी संघाची घेतली फिरकी, पराभवाचं असं केलं विश्लेषण

August 22, 2026 by admin Leave a Comment

Rashid Latif on Pakistan Team: पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची नाचक्की झाली. अवघ्या अडीच दिवसात या सामन्याचा निकाल लागला. हा सामना इंग्लंडने एक डाव आणि 103 धावांनी आपल्या खिशात घातला. या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान संघावर चोहूबाजूने टीका होत आहे. संघाची खेळण्याची पद्धत, वागणं आणि देशांतर्गत क्रिकेट वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. असं असताना पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार राशिद लतीफने एका वेगळ्या शैलीत संघावर टीकास्त्र सोडलं आहे. लतीफचं म्हणणं काय हे नेटकऱ्यांना बरोबर कळलं आहे. राशिद लतीफ म्हणाला की, पाकिस्तानसोबतच्या पराभवाचं कारण म्हणजे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची उंच शरीरयष्टी…

राशिद लतीफ काय म्हणाला?

राशिद लतीफने या पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या बहाणेबाजीवर टीकास्त्र सोडलं आहे. यासाठी मजेशीर अंदाजात या पराभवाचं विश्लेषण केलं. वेस्ट इंडिज दौऱ्यात मिळालेल्या पहिल्या कसोटीतील पराभवाची तुलना केला. लतीफने बोचरी टीका करत म्हंटलं की, वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना जिंकला होता. तेव्हाही उंच खेळाडू होते. आता हे इंग्रजही उंच आहेत. तुम्ही कधी त्यांची उंची पाहिली आहे का? हा आमच्यावर अन्याय झाला आहे.

लतीफने आयसीसी रँकिंग आणि खेळाडूंची उंची एकत्र करत टोमणा मारला. लतीफ म्हणाला की, ‘आता तुम्हाला त्याच्या उंचीच्या हिशेबाने खेळावं लागेल. ते रँकिंगमध्ये सातव्या स्थानी आहेत आणि आम्ही आठव्या. पण ते उंचीच्या हिशेबाने जिंकले. त्यांच्याकडे आर्चर, रॉबिनसन आणि जोश टंग आहेत. दुसरीकडे आमचे खेळाडू कमी उंचीचे आहेत. हे आमच्यासोबत काही योग्य नाही. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही विदेश दौऱ्याची योजना आखू तेव्हा दोन्ही खेळाडू सारख्या उंचीचे असतील याची काळजी घेऊ.’

🚨 “They won because they were taller!” — Rashid Latif’s hilarious take on Pakistan’s Test defeat 🤯

“They have tall guys like Archer, Robinson, and Tongue… our players are short!” — Rashid Latif

– Rashid Latif brings total sarcasm to the post-match breakdown, jokingly… pic.twitter.com/7AzuGLnV9N

— M Farhan (@MFarhan1200) August 21, 2026

हेडिंग्ले कसोटीचा निकाल अडीच दिवसात लागला

पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. पण पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही पाकिस्तानचा संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तानने पहिल्या डावात 171 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 135 धावा करून सर्वबाद झाले. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात एक डाव आणि 103 धावांनी सामना जिंकला. ओली रॉबिनसनला या विजयाचं श्रेय देत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याने या सामन्यात 80 धावा देत 8 विकेट काढल्या होत्या. तर जोश टंगने 89 धावा देत 8 विकेट काढल्या. जोफ्रा आर्चरने दुसऱ्या डावात 50 धावा देत 3 विकेट काढल्या.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in