• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव समोर; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री, नेमकं काय घडलं?

August 16, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आशियात इराण-अमेरिकेत संघर्ष सुरूच आहे. या संघर्षाचा संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. या संघर्षाचे परिणाम भारतावरही होताना दिसत आहे. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान नवा डाव समोर आला आहे. दोन्ही देशात संघर्ष सुरू असताना दबक्या पावलाने भारताची एन्ट्री झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी भारताला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भारत आणि इराणमधी नाते आणखी मजबूत करून पुढे जाण्याची इच्छा दर्शवली आहे, अशा शब्दात भारताला शुभेच्छा मिळाल्याने जगात चर्चांना उधाण आलं आहे.

इराणच्या दुतावासाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पेजेशकियान यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी व्यापारी संबंध आणखी चांगले बनवण्याची संधी असल्याचे म्हटलं आहे. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान यांनी भारत आणि इराणमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक नात्यांचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील नाते जुने आणि चांगले असल्याचं त्यांनी सांगितले. पेजेशकियान यांच्या मते सामायिक हितांच्या आधारावर दोन्ही देश संबंध आणखी दृढ करण्यासाठी आग्रही राहील.

इराणचे राष्ट्राध्यक्ष यांनी पुन्हा म्हटले की, तेहरान भारतासोबत नाते आणखी चांगले करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. विश्वास आणि सन्मानाच्या वातावरणात दोन्ही देशांच्या हितांसाठी चांगले पावले उचलण्यासाठी तयार आहे. तसेच भारतासोबतचे राजनैतिक आणि सामरिक संबंधाकडे इराण गांभीर्याने पाहत आहे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले की, भारताला सुखसमृद्धी,प्रगती, कल्याणासाठी शुभेच्छा. भारत आणि इराणमधील दीर्घकालीन संबंध समृद्ध व्हावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान पाठवलेल्या संदेशामुळे संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली आहे. भारत एकीकडे स्वातंत्र्याचे 80 वर्षे साजरे करत आहे. त्यामुळे त्याचे महत्व अधिकच वाढलं आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लाल किल्ल्यावरून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना विकासाच्या मुद्द्यावरून भाष्य केलं. त्यांनी येत्या 2047 सालात भारताला विकसित करणार असल्याचे ध्येय निश्चित केले. याचदरम्यान इराणने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेने वेधून घेतले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in