• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणच्या दाव्याने जगात खळबळ! युद्ध भडकण्याची शक्यता, डोनाल्ड ट्रम्प यांना दणका..

April 18, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग संकटात होते. हेच नाही तर होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेवर मोठा दबाव होता. होर्मुज खाडीत अमेरिकेनेही नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे एकही इराणचे जहाज बंदरातून बाहेर निघू शकत नव्हते. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आयात थांबली. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्ट्रीट ऑफ होर्मुज जगासाठी पुन्हा एकदा सुरू झाल्याची मोठी घोषणा केली. गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण जग होर्मुज खाडी खुली होण्याकरिता प्रार्थना करत होते. भारताचे तब्बल 15 जहाज होर्मुज खाडीत अडकली होती. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. होर्मुज खाडी खुली झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास घेतला.

इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली. मात्र, अजूनही इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही कमी होण्याचे नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा इराणकडून फेटाळून लावण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, तेहरानने आपले संवर्धित युरेनियम आम्हाला सोपवण्याची तयारी दर्शवली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हा साठा कोठेही हस्तांतरित केला जाणार नाही. हा डोनाल्ड ट्रम्प यांना अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता इराणकडून काही अटी ठेवण्यात आल्या, तशाच अटी अमेरिकेने ठेवल्या, त्यापैकी ही एक महत्वाची अट आहे. मात्र, इराणकडून सांगण्यात आले की, आमची याबाबत काहीच चर्चा झाली नाही.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी सरकारी टीव्हीवर बोलताना सांगितले की, इराणचे संवर्धित युरेनियम कोठेही हस्तांतरित केले जाणार नाही. अमेरिकेच्या इराणसोबतच्या चर्चेत संवर्धित युरेनियमचा मुद्दा कधीही उपस्थित केला गेला नव्हता, असाही त्यांनी दावा केला. इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर तणाव वाढताना दिसत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने नाकेबंदी उठवली नाही तर… इराणची हादरवणारी धमकी, जगात हाहाकार, थेट..
  • Rahul Gandhi: महिला आरक्षण विधेयक तर लोकसभेत आपटलं, पण हे ’16 नंबर’ चं काय आहे कोडं? राहुल गांधी भाजपची डोकेदुखी वाढवणार?
  • IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्या तू कॅप्टनशिप सोड आणि नेतृत्व..’ मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून कोणी केली कळकळीची विनंती?
  • Gold Price Today : अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच गुड न्यूज, सोन्याचे भाव धडाम् ! तुमच्या शहरात किती किंमत ?
  • US-Iran Talk : अमेरिका-इराण संघर्षात एक सकारात्मक बातमी, चर्चेची नवीन तारीख आणि ठिकाण ठरलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in