• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणचा अमेरिकेच्या मित्रावर भीषण हल्ला, मध्य पूर्वेत खळबळ, नागरिकांना अलर्ट जारी…

August 18, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान तणाव वाढला आहे. आता इराणची नजर पुन्हा संयुक्त अरब अमिरात (UAE)कडे वळली आहे. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करत सांगितले की एअर डिफेन्स सिस्टीमने देशाच्या येणाऱ्या क्षेपणास्राच्या धोक्यांना डिटेक्ट केले आहे.या दरम्याने दुबईतील नागरिकांना त्यांच्या फोनवर इमर्जन्सी मिसाईल अलर्ट जारी केला आहे. आणि त्यांना सरकारच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे.

‘UAE आपले सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी प्रतिबद्ध

युएई्च्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की विभागात येणारे तीव्र आवाज हे एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच नष्ट केलेल्या मिसाईलचे असल्याचे म्हटले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की संरक्षण मंत्रालय कोणत्याही धोक्याला उत्तर देण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि स्थिरतेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण तत्परतेला दुजोरा देत आहे. मात्र, काही वेळाने एक दुसरा अलर्ट जारी करुन लोकांना दिलासा दिला आहे. दुसऱ्या संदेशात म्हटले गेले आहे की आता धोका टळला आहे आणि स्थिती पूर्णपणे सुरक्षित आहे.

UEA संरक्षण मंत्रालयाने दावा केला की इराणने युएईवर दोन बॅलेस्टिक क्षेपणास्रे डागली. युएई सरकारने म्हटले आहे की आम्ही आधीही मिसाईलच्या धोक्या संदर्भात इशाऱ्याबाबत सांगितले होते. एअर डिफेन्स सिस्टीमने इराणकडून युएईच्या दिशेने डागलेल्या दोन बॅलेस्टिक मिसाईलचा शोध घेण्यात यश मिळवले आहे. पहिल्या मिसाईल समुद्र सीमेच्या बाहेर कोसळली.तर दुसरी सीमेच्या आत कोसळली.

इराणसोबत चर्चा नाही : ट्रंप

अमेरिका आणि इराण दरम्यान कोणतीही चर्चा सुरु नाही आणि पुढेही चर्चेची कोणतीही योजना नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन स्ट्रेट ऑफ होर्मुझला अमेरिकेची टेरिटरी म्हटले आहे. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या होर्मुझ स्ट्रेटमध्ये जहाजांचे येजा संपूर्णपणे सुरु आहे आणि पाण्यात पेरलेले सुरुंगांना हटवण्यात आले आहे.

इराणची आक्रमक निती

इराणने समुद्री मार्ग बंद करण्याचा दावा केला होता त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते. रॉयटर्सच्या बातमीनुसार दोन्ही देशात
दरम्यान अस्थायी युद्धविराम समाप्त झाल्याने आणि राजकीय पेच निर्माण झाल्याने इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की तेहराण आता संपूर्ण आक्रमक सैन्य रणनिती कडे वळत आहे. या संघर्षाला समाप्त करण्याची आशा संपल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच दरात पुन्हा उसळी आली आहे. जागतिक शेअर बाजारात घसरण झाली आहे. आणि अमेरिकेसह अनेक मोठ्या अर्थव्यवस्थात कर्ज घेण्याचा खर्च दशकाच्या उच्च स्तरावर पोहचला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in