
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरिकर महाराज यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनादेखील मुलीच्या विवाहा सोहळ्यास आमंत्रण दिले आहे.
इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली. खुद्द इंदोरीकर महाराज यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका समोर आली आहे. इंदोरीकर महाराज हे राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन होते.
येत्या 3 मे 2026 रोजी त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल या नवऱ्या मुलासोबत विवाह होणार आहे. लग्न सायंकाळी 6.50 वाजता होणार आहे. त्याआधी साडेचार ते साडे सहावाजेदरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
हे कीर्तनपुष्प प.पु.गुरुवर्य ह. भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव (आळंधी) यांचे कीर्तन होणार आहे. तर विवाहस्थळीच सायंकाळी 4 वाजता प. पु. स्वामी गगणगिरी महाराज यांच्या 8 व्या सप्ताहाचे ध्वजारोहण होईल.




Leave a Reply