• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आश्रमशाळेतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, ओमराजे निंबाळकर पोहोचले शाळेत..

August 22, 2026 by admin Leave a Comment


तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची बातमी tv9 मराठीवर प्रसिद्ध झाली. त्याबाबतचा एक मनाला पिळवटून टाकणारा व्हिडीओही पुढे आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचे विदारक चित्र पुढे आले. tv9 च्या बातमीमधून शाळेची विदारक अवस्थासमोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याची दखल घेत थेट आश्रमशाळेला भेट दिली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर स्वत: खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत तिथे पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. काहीही अडचण असेल तर तुम्ही मांडा असेलही आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांची विचारपूस करतानाही ते दिसले. यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नासाठी अडचणी येत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर मदतीचा हात त्यांनी पुढे केला. ओमराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना विचारले की, सर्व व्यवस्थित असते का? यावर विद्यार्थी हो म्हणताना दिसले… सरांनी सांगितले का असे बोला म्हणून? यावर विद्यार्थी नाही म्हणताना दिसत आहेत. पुढे ओमराजे निंबाळकर विचारतात की, जेवायला, अंघोळील सर्व मिळते का?… सर शिकवतात का? यावर विद्यार्थी हो म्हणताना दिसत आहेत.

झोपायला व्यवस्थित असते ना? पांघरायला आहे ना… यावर विद्यार्थी हो म्हणताना दिसत आहेत. यादरम्यान अधिकाऱ्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, माझी कायमच इकडे चक्कर असते बरं का… मी कधीही अचानक इकडे येऊ शकतो, जाता येता.. शाळेची तपासणी कितीवेळा केली जाते, हे देखील ओमराजे निंबाळकर यांच्याकडून अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.

आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, मला काय म्हणायचंय तुम्ही बाकीच्या लोकांना आवाहन जरी केले ना वाढदिवस हे तर सर्वजण मदत करतील. आम्हाला तुम्हाला दोषी म्हणायचे नाही… किंवा आम्हाला तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवायचे नाही. आम्ही काय तुमची चाैकशी करायला आलो नाही…आमचे म्हणणे आहे की, तुमच्याही काही अडचणी असतील तर आम्हाला सांगा… शासनाकडून काही कमी पडतंय का… तर आपण शासनाला बोलू…

पण या लेकऱ्यांची अशी दुरावस्था नको. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी शाळेच्या स्वयंपाक घराचीही पाहणी केली. ओमराजे निंबाळकर यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, विद्यार्थी कुठले का असेना त्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वत:च्या मुलासारखे सांभाळणे अपेक्षित आहे. कारण आपले स्वत:चे लेकरू पोटचं असेल तर त्याला आपण वाईट परिस्थितीमध्ये कधीच ठेवणार नाही. आपण त्याची काळजी घेतो. हे तर अस्थिव्यंग आहेत, त्यांची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. आजही त्यांनी जी व्यवस्था केली, त्यात काही कमी आहे, त्याबाबत मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पण हा विषय असा आहे की, कोणीही म्हटले तरीही रोज येऊन इथे बघितले जाऊ शकत नाही. शेवटी आपल्या मनानेच ही सर्व गोष्ट करणे गरजेचे आहे. मी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली तर मला असे समजले की, त्यांची सर्व व्यवस्था केली जातंय. त्यादिवशी जो काही व्हिडीओ पुढे आला, तो व्हिडीओ खरंच वाईट होता. त्यादिवशी विद्यार्थी ताट घासत बसला होता. त्यांच्या ताटात जे काही अन्न होते, ते दर्जेदार होते की नाही असे काही प्रश्न होते. प्रत्येकाच्या मनाला कोणत्याही संवेदनशिल मानसाच्या पोटात कालवणारी ती गोष्ट होती.

या गोष्टीची गंभीर दखल घेऊन कालच आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मनीषा वाघमारे यांनी भेट देऊन इथे खाद्याच्या बाबत असलेली पुर्तता पूर्ण केली. मी स्वत: येऊन विद्यार्थ्यांसोबत, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी संस्थाचालकही उपस्थित होते. माझे सर्वांना आवाहन आहे की, बॅनर लावून… फटाके वाजून तो अनावश्यक खर्च टाळून अशा विद्यार्थ्यांच्या पोटात आपण दोन खास घालू शकलो तर खऱ्या अर्थाने तो वाढदिवस साजरा केल्याचे समाधान आपल्या प्रत्येकाला मिळेल. तश्या पद्धतीचा वाढदिवस इथे साजरा करून बघा. त्यातून मिळणारे समाधान तुम्ही अनुभवाल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in