• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरे बापरे! धावत्या ट्रेनमधून हवेत उडू लागल्या 500 च्या नोटा, गोळा करण्यासाठी स्टेशनवर गर्दी, कुठे घडली घटना?

August 31, 2026 by admin Leave a Comment


सोशल मीडियावर सर्वात जळदगतीने एखाद्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून पनवेल (मुंबई) येथे जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमधून अचानक पाचशे रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्याचे पाहायला मिळाले. या नोटा गोळा करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये अक्षरशः धावपळ उडाली. काही वेळातच अनेकांनी मिळेल तितक्या नोटा गोळा केल्या आणि तेथून निघून गेले.

ही घटना पीपीगंज रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. गोरखपूरहून पनवेलकडे जाणारी एक्सप्रेस ट्रेन पीपीगंज स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या मार्गावरून जात होती. या एक्सप्रेसला पीपीगंज स्थानकावर थांबा नसल्याने ट्रेन वेगाने पुढे जात होती. त्याच वेळी ट्रेनमधून कोणीतरी पैशांनी भरलेली प्लास्टिकची पिशवी खाली फेकल्याचे सांगण्यात येते.

अचानक हवेत उडू लागल्या नोटा

मिळालेल्या माहितीनुसार, पिशवीमध्ये पाचशे रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. ट्रेनमधून खाली फेकल्यानंतर काही कारणाने पिशवी उघडली आणि त्यातील नोटा वाऱ्यामुळे हवेत उडू लागल्या. सकाळच्या वेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या लोकांचे लक्ष या नोटांकडे गेले.

सुरुवातीला अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मात्र, हवेत उडणाऱ्या नोटा प्रत्यक्ष दिसू लागल्यानंतर स्थानकावर उपस्थित नागरिकांनी त्या गोळा करण्यासाठी धाव घेतली. काही जण हवेत उडणाऱ्या नोटांच्या मागे धावत होते, तर काही जण रेल्वे रुळांच्या आणि स्थानक परिसरात पडलेल्या नोटा उचलत होते.

काही मिनिटांतच परिसरात पैशांची नाणी नाही तर चक्क पाचशे रुपयांच्या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. ज्याच्या हाती जितक्या नोटा लागल्या, तितक्या त्याने गोळा केल्याचे सांगण्यात येते.

पैसे नेमके कोणाचे?

रेल्वे स्थानकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने आपल्या परिचिताला पैसे देण्यासाठी मोठी रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवली असावी. पीपीगंज स्थानकावर ट्रेन थांबत नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने चालत्या ट्रेनमधून ही पिशवी खाली फेकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, पिशवी खाली पडताच ती उघडली आणि त्यातील नोटा वाऱ्यामुळे उडून परिसरात विखुरल्या. त्यामुळे पैसे घेण्यासाठी ज्याच्यासाठी ही रक्कम पाठवण्यात आली होती, त्या व्यक्तीपर्यंत ती पूर्णपणे पोहोचली की नाही, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेतील सर्वात मोठे गूढ म्हणजे ही रक्कम नेमकी कोणाची होती आणि ती कोणाला देण्यात येणार होती? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान संघ आहे की नाटक कंपनी..! इमाम उल हकचा ड्रामा पाहून स्टूअर्ट ब्रॉडचा संताप, म्हणाला..
  • अंबानींनाही टक्कर देतंय मुंबईतील एक कुटुंब, जमीन एवढी की अँटालियाही काहीच नाही… या उद्योजकाचं तुमच्याशीही खास कनेक्शन
  • मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख… 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
  • यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
  • रेवती लेलेचा पहिला मंगळागौरीचा साज, पारंपरिक नऊवारीतील सुंदर लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in