• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आरएसएसचे माजी प्रवक्ते राम माधव ISI च्या रिटायर्ड अधिकाऱ्यांंना भेटले, चार मुद्द्यांवर चर्चा.., प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक आरोप

August 22, 2026 by admin Leave a Comment


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे.  असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच याच मुद्द्यावरून त्यांनी विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला आहे. या देशातील विरोधी पक्षांचे दुर्दैव आहे की, विरोधी पक्षनेते हे भारतीय सुरक्षा आणि राम माधव यांच्या भेटी बद्दलचे प्रश्न उपस्थित करतांना दिसत नाहीयेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 

‘मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. हे चार मुद्दे काय होते? याचा खुलासा RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. या देशात ‘मन की बात’ सांगणारे पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस आणि राम माधव यांना आयएसआय (ISI)चे पदाधिकारी, परराष्ट्र खात्याचे अधिकारी यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? या देशातील विरोधी पक्षांचे दुर्दैव आहे की, विरोधी पक्षनेते हे भारतीय सुरक्षा आणि राम माधव यांच्या भेटी बद्दलचे प्रश्न उपस्थित करतांना दिसत नाहीये. वंचित बहुजन आघाडीला आता राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. लोकांना माझे आवाहन आहे की, त्यांनी याविषयी सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये चर्चा करावी आणि सरकारला जाब विचारावा.’ असं आपल्या पोस्टमध्ये आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

मागील काही महिन्यात आरएसएसचे पूर्वीचे प्रवक्ते राम माधव हे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसएस (ISI) च्या काही रिटायर्ड अधिकाऱ्यांना श्रीलंकेत भेटले. या भेटीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी आमची माहिती आहे. हे चार मुद्दे काय होते? याचा खुलासा RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केला… pic.twitter.com/F6vZFUbk1T

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 21, 2026

चर्चेला उधाण  

दरम्यान राम माधव यांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयच्या निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, यावेळी चार मुद्द्यांवर चर्चा झाली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in