• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयांनो, मुलांचे रील्सचे व्यसन झटक्यात सुटणार! तुळशीच्या पानाचा चमत्कार माहिती झाला का? त्या दाव्याने…

August 15, 2026 by admin Leave a Comment


मोबाईलच्या कव्हरमध्ये तुळशीचे पान, बेलपत्र अथवा पिंपळाचे पान ठेवल्याने मोबाईलमधून निघणारे रेडिएशन कमी होते. त्याचा परिणाम कमी होत. याशिवाय रील्स पाहण्याची सवय, व्यसनही कमी होते असा दावाही करण्यात येत आहे. या दाव्यामुळे सर्व आयांचा, पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण सध्या बालगोपालांनाच नाही तर तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. काय आहे हा दावा? आणि कोणी केला तो दावा?

तुळशीचे पान करणार रील्सच्या व्यसनातून सुटका?

मोबाईलच्या कव्हरमध्ये तुळस, बेलपत्र अथवा पिंपळाचे पान ठेवल्याने रेडिएशनची तीव्रता कमी होते. रील्स पाहण्याचे व्यसन कमी होते असा दावा लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (KGMU) आयुष्य विभागाचे प्रभारी डॉ. सुनीत कुमार मिश्रा यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, ही पानं मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवावीत. यामुळे मेंदू आणि शरीराला हलके वाटते. मुलांचे अभ्यासतही मन लागते. ही एकप्रकारची थेरपीच आहे. त्यांच्या उपचार कक्षात मोबाईल आणि रील्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारच्या उपचारांचा वापर केला जात असल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.

औषधांसोबत काही पारंपारिक पद्धती आणि समुपदेशन करण्यात येते. त्यावर अजूनही संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले. रुग्णांना मोबाईल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपचारांमुळे मुलांपासून वृद्धांपर्यंत चांगले परिणाम दिसून आल्याचा दावा डॉ. मिश्रा यांनी केला. त्यांच्या विभागात दर महिन्याला सरासरी 15 रुग्ण दाखल होतात. ते मोबाईल आणि रील्सचे व्यसनावर उपचारासाठी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

या औषधांचाही वापर

मोबाईल फोबियावर बोलताना हा एक प्रकारचा मानसिक त्रास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या आजारावर भारतीय आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जातात. मोबाईल आणि रील्सच्या व्यसनावर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करण्यात येतो असे सांगितले. सतत मोबाईल स्क्रीन पाहिल्याने एकाग्रतेवर परिणाम होतोच पण मायग्रेन आणि इतर त्रासही वाढतो. एकाग्रता भंग होतो. चिडचिड वाढते. राग वाढतो. त्यावर ब्राह्मी, अश्वगंधा आणि जटामांसी या आयुर्वेदिक औषधांचा प्रयोग करण्यात येतो. यामुळे दीर्घकालीन मदत मिळू शकते असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

या समस्येपासून वाचण्यासाठी पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करावा आणि अभ्यास, कामाच्या वेळी फोनपासून दूर राहावे असा सल्लाही त्यांनी दिला. आजचा जमाना हा डिजिटलचा आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि इंटरनेट हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. या उपकरणांमुळे आयुष्य सोपे झाले आहे. पण सोशल मिडिया स्क्रोल आणि दिवसभर स्क्रीनसमोर राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिस्क्लेमर: तुळशीचे पान, बेलपत्र, पिंपळाचे पान मोबाईल रेडिएशन कमी करते अथवा रील्सचे व्यसून दूर करते हा दावा अद्याप शास्त्रीय पुराव्यानिशी सिद्ध झालेला नाही. टीव्ही ९ मराठी त्याविषयीचा कोणताही दावा करत नाही.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in