
आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेऊन गुजरात टायटन्सने साजेशी खेळी केली. गुजरात टायटन्सने 20 षटकात 3 गडी गमवून 205 धावा केल्या. यात साई सुदर्शनच्या एकटाच्या 100 धावा आहेत. (Photo: IPL/BCCI)
साई सुदर्शनने 58 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 172.41 चा होता. त्याच्या शतकामुळे गुजरात टायटन्सला समाधानकारक धावसंख्या करता आली. (Photo: IPL/BCCI)
साई सुदर्शनला मुंबई इंडियन्सविरुद्ध आपले खातेही उघडता आले नाही. मात्र, आरसीबीविरुद्ध 33 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने आयपीएल इतिहासात सर्वात जलद 2000 धावा करण्याचा मान मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)
साई सुदर्शनने 47 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने हा पराक्रम 48 डावांमध्ये केला होता. (Photo: IPL/BCCI)
साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी आरसीबीविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 100पेक्षा जास्त धावांची सलामीची भागीदारी केली. या दोघांनी आठव्यांदा अशी कामगिरी केली. या यादीत विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानावर असून त्यांनी 10 वेळा अशी कामगिरी केली आहे. तर विराट कोहली आणि ख्रिस गेलने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo: Gujarat Titans Twitter)




Leave a Reply