• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘आम्हाला काही धक्के लागणार…’ कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी हेड कोच गौतम गंभीर असं का म्हणाला?

August 22, 2026 by admin Leave a Comment

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत भारतासाठी आता करो या मरोची लढाई आहे. प्रत्येक सामन्यात विजय नोंदवणं भाग आहे. तर आणि तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला असून दुसरा सामना जिंकून क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, हेड कोच गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताची करो या मरोची स्थितीत आल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण या साखळीत भारताने दक्षिण अफ्रिकेकडून घरच्या मैदानावर 0-2 ने पराभवाची धूळ चाखावी लागली होती. गौतम गंभीरने सूत्र हाती घेतल्यानंतर हा कसोटीतील दुसरा मोठा पराभव होता. त्यामुळे त्याला कार्यमुक्त करण्याची मागणीने जोर धरला होता. पण आता श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडिया योग्य ट्रॅकवर असल्याचं दाखवून दिलं आहे. असं असूनही गौतम गंभीरच्या मते टीम इंडियाला आणखी धक्के बसू शकतात.

काय म्हणाला गौतम गंभीर?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितलं की, टीम संघर्ष नाही तर मागच्या एका वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. हेड कोच गौतम गंभीर म्हणाला की, ‘आम्ही संघर्ष करत नाहीत, क्रमावारी काही महत्त्वाची नाही. आम्ही एका संक्रमणातून जात आहोत. आम्हाला मध्ये काही धक्के लागतील, पण आम्ही इंग्लंड दौऱ्यापासून सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळत आहोत.’ दुसरीकडे, गौतम गंभीरने त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवरही स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. गौतम गंभीर म्हणाला की, सोशल मीडियावर व्ह्यू आणि लाईकवर माझं लक्ष नाही तर टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यावर आहे.

प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरवर कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर बराच दबाव असल्याचं दिसून येत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर हा दबाव काही अंशी कमी झाला आहे. गॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. आता कोलंबो कसोटी जिंकून मालिका खिशात घालण्याचा मानस असेल. जर असं झालं तर गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाचा पहिला कसोटी मालिका विजय असेल. दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर होत आहे. या सामन्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर व्यक्त झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in