• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमदार लांडगेंची प्रक्षोभक भाषा, फाशीची वाट पाहू नका… हातात मिळेल त्याने हाणा…

August 21, 2026 by admin Leave a Comment


सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत मनीषा केसरीकर आणि त्यांचे पती मोहन केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी केसरीकर यांचा शेजारी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सांगली शहरातून मोर्टा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे यांच्यासह आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते. यावेळी भाषण करताना आमदार लांडगे यांनी प्रक्षोभक भाषा वापरली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आरोपीला फाशी होईल याची वाट पाहू नका – लांडगे

आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘मुस्लिम लोकांकडून खरेदी करू नका, आर्थिक नियोजन बिघडवा. पोलीस येतील त्याला फाशी होईल याची वाट पाहू नका, हातात मिळेल त्याने हाणा. तो कुटूंबाला त्रास देत होता. हिंदू समाजावर अन्याय होतो तो बघतच रहायचा का? प्रत्येक वेळेस सरकारलाच दोषी धरायचं का? सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. केसरीकर हत्या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा मिळणार. या जिहाद्यांचं मतदान आम्हाला बिलकुल नको आहे. असे कृत्य करणाऱ्यांचं तर बिलकुल नको.’

आम्हाला परत हातात तलवार घ्यायला लावू नका – जगताप

आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘त्याला दाढी वाढवायचं समजतं. टोपी घालायचं समजतं, हा येडा आहे का? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवलं आहे जिहादी दिसले की काय करायचं. आम्हाला परत तलवार घ्यायला लावू नका. आम्ही तुमचा कडेलोट करू. ती वेळ लांब नाही की त्यांना चौका-चौकात फाशी दिली जाईल. हिंदू हिंदुस्थानमध्ये राहिला पाहिजे. अशा घटनांमध्ये अफवा पसवरल्या जातात की तो मनोरुग्ण आहे. या माईंड गेममध्ये अडकू नका.’

पडळकर यांना अश्रु अनावर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ’15 ऑगस्ट आनंद देणारा दिवस. झेंडावंदन करण्याचा दिवस. तुम्ही शेजारी का राहता असे बोलून चाकू भोकसला.’ हा घटनाक्रम सांगताना गोपीचंद पडळकर गहिवरले, त्यांना अश्रू अनावर झाले. रडत रडत गोपीचंद पडळकर यांनी भाषण सुरूच ठेवले. पुढे पडळकर यांनी म्हटले की, ब्रेन डेड झाला, हातोडा इतका जबरी लागला की मेंदूने काम करण बंद केलं. माझ्या शेजारी हिंदू का राहतो म्हणून मारलं. लोकांना प्रश्न या पोरांचा काय दोष? यांच्या बापाचा आणि कोणाचा वाद नाही, कर्नाटकातील हे लोक आहेत. आता या लेकरांच्या पालकांच्या मीटिंगला कोण जाणार? या लेकरांना आर्थिक मदत करा. मी 2 लाख रुपये यांच्या खात्यावर टाकतो, तुम्हीही मदत करा. राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला लक्ष देत आहे, ते या जिहादीला फाशी देतील. तो मनोरुग्ण नाही, सकाळी 6 वाजता नमाज पढून आला होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in