
शिवसेना पक्षाच्या चिन्हावर आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ॲड. देवदत्त कामत यांनी महत्त्वाचे युक्तिवाद मांडले. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवर योग्य वेळी निर्णय घेतला नाही, असा आरोप कामत यांनी केला. अध्यक्षांनी प्रकरण योग्य प्रकारे हाताळले नाही आणि त्यामुळे त्यांचा विश्वास गमावला आहे, असे कामत यांनी न्यायालयासमोर सांगितले. कामगट यांनी युक्तिवाद केला की, विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतल्यास आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. यासाठी त्यांनी राणा खटला, सुभाष देसाई प्रकरण तसेच ओमकुमार आणि बी.सी. चतुर्वेदी यांच्या प्रकरणांसह अनेक जुने दाखले दिले.
विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष पूर्णपणे वेगळे असून, फूट केवळ विधिमंडळ पक्षात पडली होती, राजकीय पक्षात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर सर्वोच्च न्यायालयाने, आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. आमदारांची मुदत संपली असली तरी या प्रकरणावर न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे, असे कामत यांनी म्हटले.
Leave a Reply