• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता ATM मधून पैसे काढल्यास मोठा चार्ज लागणार? SBI चा नवा नियम आला, अटी काय?

August 19, 2026 by admin Leave a Comment


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही महिन्यात अनेकदा ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागू शकतो. कारण बँकेने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेधारकांसाठी रोख पैसे काढण्यासंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. या नव्या नियमानुसार, महिन्यात ठरावीक संख्येपेक्षा जास्त वेळा रोख पैसे काढल्यास ग्राहकांना शुल्क भरावे लागू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

1 ऑक्टोबरपासून काय बदलणार?

SBI चा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. त्यानंतर BSBD खात्यातून दर महिन्याला चारवेळा पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 15 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. याशिवाय या 15 रुपयांच्या शुल्कावर लागू असलेला GST देखील भरावा लागेल. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे.

BSBD अकाउंट म्हणजे काय?

BSBD म्हणजे Basic Savings Bank Deposit Account. हे खाते विशेषतः अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना कमी किंवा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बचत खाते सुरू करायचे आहे. या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नसते.

BSBD खात्याची वैशिष्ट्ये काय?

  • खातेधारकाला बेसिक RuPay ATM-कम-डेबिट कार्ड दिले जाते.
  • या कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क आकारले जात नाही.
  • या खात्यातून शाखा किंवा ATMच्या माध्यमातून पैसे काढता येतात.
  • या खात्यासाठी चेकबुकची सुविधा उपलब्ध नसते.
  • NEFT आणि RTGS यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे जमा करण्यासाठी शुल्क आकारले जात नाही.
  • निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

BSBD अकाउंट उघडण्यासाठी काय नियम आहे?

तुम्हाला SBI मध्ये BSBD खाते उघडायचे असल्यास एक महत्त्वाची अट आहे. तुमच्या नावावर SBI मध्ये दुसरे कोणतेही बचत खाते असता कामा नये. जर तुमचे SBI मध्ये आधीपासून बचत खाते असेल, तर BSBD खाते उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत जुने बचत खाते बंद करावे लागेल.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in