• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता विना PIN पेमेंट; या बड्या बँकेचे नवीन बायोमॅट्रिक फीचर, तुम्हाला कसा काढता येणार पैसा?

April 30, 2026 by admin Leave a Comment


PIN Free Payment: डिजिटल बँकिंग आता अधिक सुरक्षित आणि सुविधाजनक करण्यासाठी बँकांचा प्रयत्न सुरू आहे. ICICI बँकेने अजून एक पाऊल पुढं टाकलं आहे. मोबाईल बँकिंग ॲप iMobile वर 5,000 रुपयांपर्यंतचा युपीआय व्यवहारासाठी बायोमॅट्रिक ऑथेटिंकेशन सेवा सुरू केली आहे. आता ग्राहकांना छोट्या छोट्या व्यवहारांसाठी UPI पिन लक्षात ठेवण्याची गरज उरली नाही.

फिंगरप्रिंट आणि फेस आयडीचा वापर

बँकेनुसार, नवीन सुविधा ॲड्रॉईड आणि iOS या दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ॲड्रॉईड युझर्ससाठी त्यांच्या फिंगरप्रिंटचा वापर करू शकतील. तर आयफोन युझर्स हे फेस रिकग्निशन आधारे झटपट व्यवहार करू शकतील. ही सुविधा केवळ 5,000 रुपयांपर्यंतच्या पीअर टू पीअर व्यवहार, क्युआर कोड स्कॅन आणि ऑनलाईन मर्चंट पेमेंट्साठी लागू असेल. पण 5,000 रुपयांपेक्षा अधिक व्यवहारासाठी ग्राहकांना UPI पिन नोंदवणे अनिवार्य आहे.

सुरक्षेसह गतिमान व्यवहार

ICICI बँकेची ही सुविधा बायोमॅट्रिक पेमेंट जलद गतीने करेल आणि ते सुरक्षितही असेल. सार्वजनिक ठिकाणच्या इंटरनेटचा वापर करून पिन नोंदवणे हे घातक ठरते. NPCI ने ऑक्टोबर 2025 मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मंजूरी दिली होती. आता बँकेने त्यांच्या प्लॅटफॉर्वर या सुविधेचा वापर सुरू केला आहे. युझर्सला त्यांच्या सुविधेनुसार पिन अथवा बायोमॅट्रिक वापराचा पर्याय उपलब्ध आहे.

अनेक एटीएमवर युपीआय पेमेंट सुविधा

आता अनेक बँकांच्या एटीएम केंद्रावर नवीन एटीएम आले आहेत. या नवीन एटीएम मशीनवर आता क्यूआर कोड स्कॅन आणि युपीआय कोड स्कॅन असे पर्याय दिसत आहेत. तुम्ही वॉलेट अथवा एटीएम कार्ड घरी विसरला असाल तरी तुमचा व्यवहार थांबणार नाही. तुम्हाला एटीएम केंद्रावर रक्कम काढता येईल. मोबाईलमधील तुमच्या फोनपे, गुगल पे अथवा इतर युपीआय ॲपवरून एटीएममधून रक्कम काढता येईल. त्यासाठी मोबाईलमधील संबंधित ॲप ओपन करून एटीएम मशीनवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर एटीएम मशीनवर पुढील प्रक्रिया केल्यानंतर एटीएम मशीनमधून निश्चित केलेली रक्कम काढता येईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!
  • शौचालय, बाथरुम ते रेडिओ लॅपटॉप, तुम्हाला जनगणनेत विचारले जाणार हे प्रश्न; अगोदरच समजून घ्या प्रक्रिया!
  • या अभिनेत्रीने 20 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स, तिच्यावर झालेले डबल मिनिंगचे आरोप
  • विमान प्रवासात जर तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवण्यास विसरलात तर काय होईल? खरच प्लेन क्रॅश होतं का?
  • कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in