• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता थेट मेडिकलमधून कफ सिरफ मिळणार नाही, औषध खरेदीसाठी… मुलांच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा नियम

June 16, 2026 by admin Leave a Comment


आता कफ सिरफ मेडिकलमध्ये सहज उपलब्ध नसणार… सरकारने मोठा निर्णय घेतल्यानंतर कप सिरफच्या विक्रीवर नवीन बंधणं लादण्यात आली आहेत. कफ झाल्यानंतर अनेक प्रकारचे सिरफ मेडिकलमधून सहज उपलब्ध व्हायचे. पण आता तसं होणार नाही. कारण कफ सिरफसाठी आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने ‘ड्रग्ज रूल्स, 1945’ मध्ये सुधारणा करून सिरपच्या ‘ओव्हर-द-काउंटर’ (OTC) विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर, फार्मसीमधून सिरप खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधाची चिठ्ठी असणं अनिवार्य असेल.

केंद्र सरकारने 9 जून 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ‘ Drugs (Fifth Amendment) Rules, 2026 ‘ लागू केलं आहेत. ही सुधारणा Drugs and Cosmetics Act, 1940 च्या कलम 12 आणि 33 अन्वये करण्यात आली असून, अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून ती अंमलात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कफ सिरप आणि इतर औषधी सिरप खरेदी करण्यासाठी ग्राहकांना नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन मेडिकलमध्ये सादर करणं आवश्यक असेल. अशात सरकारने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम, सिरपच्या नियमित खरेदीवर होईल. कारण यापूर्वी कफ सिरफ मेडिकलमधून थेट खरेदी करता येत होतं.

मुलांच्या मृत्यूनंतर मोठा निर्णय…

मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे दुषित कफ सिरफ घेतल्यामुळे मुलांचं निधन झालं होतं. त्यानंतर औषधांची गुणवत्ता आणि देखरेखीवर अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. या घटनेनंतर सिरपच्या निर्मिती आणि विक्रीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एवढंच नाही तर, या सुधारणेचा मसुदा 30 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला होता आणि त्याबाबत सामान्य जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार केल्यानंतर अंतिम सुधारणेची अधिसूचना जारी करण्यात आल्याचं सरकारने नमूद केलं आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सहसचिव हर्ष मंगला यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरातील सर्व देशभरातील फार्मसींना आता सिरप विक्रिबाबतच्या नव्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नव्या नियमांनुसार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतंही सीरप ग्राहकांना खरेदी करता येणार नाही.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..
  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in