• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका, तुमचंच होणार नुकसान

June 30, 2026 by admin Leave a Comment


आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांना मदतीची गरज भासते. पण कोणाला मदत करायची आणि कोणाल मदत करु नये, हे समजून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, आयुष्यात यश मिळवण्याची इच्छा नसलेला असा कोणीही नाही. अशा व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस एक शर्यत असतो. मात्र, या प्रयत्नांदरम्यान त्यांना विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशा संकटांवर कशी मात करावी, हे महान विद्वान चाणक्य यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्पे आणि क्षेत्रांचा उल्लेख आहे. चाणक्य नीतीनुसार असं म्हटलं जातं की, काही लोकांना मदत केल्याने तुमचेच नुकसान होतं. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या लोकांची मदत करु नये.

जरी इतरांना मदत करणे हा एक चांगला मानवी गुण असला तरी, कधीकधी आपण केलेली मदत आपल्यासाठीच मोठं दुर्दैव ठरते. प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी, आचार्य चाणक्य, त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात सांगतात की, एखाद्या व्यक्तीला मदत करण्यापूर्वी त्याचा खरा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे. ते असा इशारा देतात की, जर आपण विशिष्ट स्वभावाच्या लोकांना मदत करायला गेलो, तर आपण स्वतःचंच नुकसान करून घेऊ.

चाणक्य म्हणतात की, जे सतत चुका करतात किंवा जे केवळ इतरांचे नुकसान करण्याचा विचार करतात, त्यांना कधीही मदत करू नये. तुम्ही अशा लोकांना कितीही मदत केली तरी, ते स्वतःचा खरा स्वभाव बदलणार नाहीत. एवढंच नही तर, त्यांना इतरांना फसवण्यास आणि अमली पदार्थांच्या सेवनासारख्या वाईट गोष्टींमध्ये गुंतवणं हे देखील चुकीचं आहे. यामुळे तुम्ही मोठ्या धोक्यात सापडू शकता.

काही लोक, त्यांच्याकडे आयुष्यात कितीही असलं तरी, नेहमी त्यांच्या समस्यांबद्दल तक्रार करत राहतात. आयुष्यातील केवळ उणिवा पाहणाऱ्या अशा नकारात्मक लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला नैराश्य येईल. तुम्ही त्यांना कितीही मदत केली तरी, ते नेहमी दुःखीच राहतील आणि तुमची मानसिक शांतीसुद्धा हिरावून घेतील.

काही लोकांना काय बरोबर आहे हे ऐकण्यात अजिबात रस नसतो. ते हट्टी असतात आणि त्यांचा असा विश्वास असतो की फक्त ते जे करतात तेच बरोबर आहे. त्यांच्याशी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करणं हा निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असलेल्या त्यांना सुधारण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न केला, तर ते तुमचे ऐकणार तर नाहीतच, पण तेच तुम्हाला शत्रू म्हणूनही पाहू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in