• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आई ICU मध्ये शेवटच्या घटीका मोजत असताना शाहरुख खानने वापरलेले वाईट शब्द, त्याला आजही होतोय पश्चाताप

August 19, 2026 by admin Leave a Comment


Shah Rukh Khan Recall Mother Death: अभिनेता शाहरुख खान याला तुम्ही देखील कायम एक गोष्ट सांगताना ऐकलं असेल आणि ती म्हणजे त्याच्या आयुष्यावर आई – वडिलांचा मोठा प्रभाव आहे. पण शाहरुख खान किंग खान होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आणि आईचं नाव लतीफ फातिमा असं होतं. अनेक वर्षांपूर्वी किंग खान याने एक आईच्या शेवटच्या क्षणांचा खुलासा केलेल आणि सांगितलं शेवटच्या क्षणी कशा प्रकारे आईला भावनात्मक रित्या वेदना पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला. कारण अभिनेत्याला असं वाटलं होतं की, आईला वेदना पोहोचवल्यामुळे ती सोडून जाणार नाही.

2014 मध्ये ‘द अनुपम खेर शो कुछ भी हो सकता है’ शोमध्ये अभिनेत्याने आई वडिलांबद्दला भावना व्यक्त केल्या होत्या. अभिनेत्याच्या वडिलांचं निधन 1981 मध्ये कॅन्सरमुळे झालं होतं. त्यानंतर 1991 मध्ये किंग खानच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आईचे शेवटचे क्षण आठवत अभिनेता म्हणला, ‘माझ्या आईची प्रकृती पूर्णपणे ठिक-ठाक होती. पण अचानक तिच्या पाय प्रचंड दुखू लागले. त्यानंतर कळलं की, तिला डायबिटीज आणि एक महिन्यानंतर तिचं निधन झालं.’

अभिनेत्याच्या आईला जेव्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, तेव्हा किंग खान सतत प्रार्थना करत होता. शाहरुख खान म्हणाला, ‘ती ICU मध्ये होती. तेव्हा ICU मध्ये तिला भेटण्याची परवानगी नव्हती. कोणी एकाने मला सांगितलं होतं की, तू फक्त प्रार्थना करत राहा, अल्लाला तुझी प्रार्थना ऐकण्यात व्यस्त राहतील आणि वाईट करण्यापासून त्यांना सवड मिळणार नाही…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘मला 100 वेळा दुआ पठण करायची होती. पण मी कायम गरजेपेक्षा जास्तच करतो.. त्यामुळे मला असं वाटलं की, प्रार्थना पण जास्त केली पाहिजे. मी प्रार्थना करत राहिलो. तेव्हा डॉक्टर खाली आले आणि मला म्हणाले, ‘आईला भेटू शकता… ‘, तेव्हा मला कळून चूकलं आई शेवटच्या घटीका मोजत आहे म्हणून भेटण्याची परवानगी दिली.’

शाहरुख खानला असं वाटलं की, माणसं तेव्हाच या जगाचा निरोप घेतात जेव्हा त्यांना आपल्या पश्चात मागे राहणाऱ्यांविषयी मनःशांती लाभते; त्यामुळे, आपल्याबद्दलची चिंता कायम राहिल्यास आई जिवंत राहील या आशेने, त्याने मुद्दाम तिला दुःखी करण्याचा प्रयत्न केला. याचा पश्चाताप आईला होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in