• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आई-मुलादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह सीन; ओटीटीवर येताच प्रसिद्ध सीरिज वादात, भडकले प्रेक्षक

June 23, 2026 by admin Leave a Comment


‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा बहुचर्चित तिसरा सिझन अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या सीरिजला प्रेक्षकांकडून पसंती मिळतेय, तर दुसरीकडे यातील एका सीनवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन 3’मध्ये आई आणि मुलादरम्यान एक असा सीन दाखवण्यात आला आहे, जो पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या सीनवरून प्रेक्षक सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. या प्रतिक्रिया पाहून अखेर सीरिजमधल्या अभिनेत्याने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘हाऊस ऑफ द ड्रॅगन 3’मध्ये दाखवलं आहे की एलिसेंट हाइटावर (ऑलिव्हिया कुक) तिचा मुलगा एमोंडला (इवान मिशेल) किंग्स लँडिंग सोडण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा भावूक होऊन एमोंड म्हणतो की, तो तिचा मोठा मुलगा असता तर किती बरं झालं असतं. त्यानंतर तो त्याच्या आईलाच किस करू लागतो, ज्यामुळे एलिसेंट अस्वस्थ होते. आई आणि मुलामधील या किसिंग सीनमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या सीनवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘एमोंडने त्याच्या आईलाच किस केलं, मी असं काहीतरी पाहिलंय यावर विश्वासच बसत नाहीये’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन ही सीरिज प्रेक्षकांना चकीत करण्याचे नवनवीन मार्ग शोधतच राहते’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘या सिझनमधील हा सर्वांत वादग्रस्त सीन आहे. दिग्दर्शक जॉर्ज आर. आर. मार्टिन खरंच रोज सकाळी उठून विचार करतात की मी कौटुंबिक नातेसंबंध आणखी किती वाईट दाखवू शकेन’, असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

AEMOND JUST KISSED HIS MOM ALICENT?!
I had to rewind three times because there’s no way my eyes just witnessed that. House of the Dragon keeps finding new ways to leave me absolutely speechless.#HouseoftheDragon #HOTD pic.twitter.com/iNzMS3suj6

— sanmeyo (@oyemnassxo) June 22, 2026

अभिनेत्याचं स्पष्टीकरण

सीरिजमधील या वादग्रस्त सीनवर आता एमोंडची भूमिका साकारलेल्या इवान मिशेलने स्पष्टीकरण दिलं आहे. या सीनमधून हेच अधोरेखित होतं की एमोंडची प्रेम दर्शवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे, असं त्याने म्हटलंय. ‘पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने पुढे सांगितलं, “तो सीन पाहून काहींना कदाचित उल्टी आल्यासारखं वाटू शकतं. अर्थात ते चकीत करणारंच आहे. पण त्याचसोबत मला एका आव्हानात्मक नजरेतून एमोंड या भूमिकेकडे पाहण्याची संधी मिळाली. ही गोष्ट पचवणं खरंतर खूप कठीण असेल ना? आपल्याच आईला किस करणं, तेसुद्धा तशा पद्धतीने.”

“एमोंडला लहानपणी त्याच्या आईकडून आणि कुटुंबाकडून इतकं प्रेम कधीच मिळालं नाही. त्यामुळे स्वत:बद्दल एक संतुलित दृष्टीकोन विकसित करण्यासाठी त्या मुलाला अशा प्रकारच्या बिनशर्त प्रेमाची गरज असते. एमोंडला ते कधीच मिळालं नाही. त्यामुळे त्याचा विचार खूप वेगळा आणि विचित्र आहे. त्याची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही खूप विचित्र आहे”, अशी बाजू इवानने मांडली. मात्र यावरूनही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला… बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
  • 77 वर्षांपूर्वीचं गाणं, जे माईकपासून 25 फूट दूर उभे राहून लता मंगेशकर यांनी गायलेलं, आजही ऐकलं तरी..
  • कसली डेंजर निघाली ‘ती’; लग्नासाठी पॅलेस , खासगी विमानं बूक… बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू नव्हे तर हत्या, जवळच्या व्यक्तीनेच काढला काटा
  • ‘सनई चौघडे’मध्ये जय-शर्वरीच्या प्रेमकहाणीला सुरुवात; रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
  • मी लागतो नादाल चल, दाखव काय…, राऊतांचं संजय पाटलांना थेट आव्हान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in