• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंबे खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणे का महत्त्वाचे? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे

May 20, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा सुरू झाला की आंबा बाजारात दाखल होतो. त्यात प्रत्येकजण मोठ्या आवडीने आंबे खातात. क्वचितच असं कोणी असेल ज्याला आंबा हा आवडत नाही. पण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आपल्याला आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की यामुळे फळातील उष्णता कमी होते. आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. सर्व फळांमध्ये आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखले जाते. त्यांची गोड चव इतकी अप्रतिम असते की काही लोकं त्यांचा आस्वाद घेण्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात. भारतात सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या आंब्याच्या जातींमध्ये लंगडा, चौसा, तोतापुरी, हापूस, दसरी आणि मुलगोबा यांचा समावेश आहे.

उन्हाळ्यात आंब्याचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. त्यापैकी सर्वात सामान्य प्रकार म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर आंबे खाणे. तर या आंब्याच्या हंगामात प्रत्येक घरी स्मूदी, कँडी, लोणची, मँगो पापड, कैरीचं/आंब्याचं पन्हं, चटण्या आणि अगदी भाजीच्या पदार्थांमध्येही आंब्याचे समावेश केला जातो. तर अशातच आंब्याचे सेवन करताना आंबा खाण्यापुर्वी पाण्यात काही वेळ ठेवणे का महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे शरीराला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

आंब्यातील पोषक तत्वे

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बी कॉम्प्लेक्स असतात. त्यात फायबर, लोह, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. फळांचा राजा असलेला आंबा केवळ आपली रोगप्रतिकारशक्तीच सुधारत नाही, तर डोळ्यांसाठीही फायदेशीर मानला जातो.

आंबे खाण्यापूर्वी पाण्यात काही वेळ ठेवणे का महत्त्वाचे आहे?

आंबा हे उष्ण फळ आहे आणि उन्हाळ्यात त्याचे जास्त सेवन केल्यास पोट फुगणे किंवा पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त काही लोकांना मुरुमे येतात. आंबे भिजवल्याने त्यातील उष्णता कमी होते, असे मानले जाते. तज्ञांच्या मते पाण्यात आंबा काही वेळ ठेवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड निघून जाते.

यामुळे पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. असे म्हटले जाते की, फायटिक ॲसिडमुळे शरीर लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर काही खनिजे शोषून घेऊ शकत नाही, ज्यामुळे खनिजांची कमतरता निर्माण होते. हे ॲसिड शरीरात उष्णता निर्माण करते, म्हणूनच आंबे देखील खाण्याआधी पाण्यात ठेवले पाहिजेत.

आंब्याचे आरोग्यदायी फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवते – आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी आंब्याचे सेवन उत्तम ठरते.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर – आंब्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. शिवाय आंब्यामधील पाण्याचे प्रमाण एन्झाइम्सना सक्रिय करण्यास प्रभावी ठरते. त्यात अमायलेज नावाचे एन्झाइम असते, जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तथापि आंब्याचे अतिसेवन केल्यास पोटदुखी आणि जुलाबसुद्धा होऊ शकतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर – आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवते. त्यामुळे हे फळ केवळ चवीला चविष्टच नाही, तर आपल्या शरीरासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?
  • Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू
  • ‘धुरंधर’मधल्या ‘जमील जमाली’चा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
  • ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..
  • 6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in