• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अॅपआधारित टॅक्सी चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत सादर करण्याचे आदेश, चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व

September 9, 2026 by admin Leave a Comment


‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करावी. चालकांची ओळख, वास्तव्य तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ चे सदस्यत्व देण्यात येणार आहे. यासाठी चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र तसेच आवश्यक ती सर्व माहिती तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कामगार कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करणे, व्यवहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येईल. तसेच त्यांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घ्यावी. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची आवश्यक माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80s Photo Trend : 80s फोटो ट्रेंड सुपरहिट; पण फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर…
  • मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
  • नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज मनोज जरांगे यांच्या भेटीला, मोठ्या घडामोडी….
  • व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता…
  • Amruta Fadanvis : ते माझे भाऊ; अमृता फडणवीसांचं जरांगें पाटलांना जेवणाचं निमंत्रण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in