
Ahmedabad News: गुजरात येथील अहमदाबाद येथे एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन आग लागल्याने आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. त्यामुळे संपूर्ण परिसरात अफरातफर माजली. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहे.
अहमदाबाद येथील महमूदपुरा भागातील गॅट्रेड रोड येथील टॅलेंट फायरवर्क्स फॅक्ट्रीत मोठा स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे संपूर्ण भागात मोठा आवाज आल्याने घबराट पसरली. या दुर्घटनेत आता पर्यंत आठ जणांचे प्राण गेले आहेत. या स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत बचाव मोहीम सुरु केली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply