
Mirzapur Elephant Terror : पावसाळा येताच फक्त गावांत नव्हे तर शहरातही अनेक धोके उद्भवतात. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील मिर्झापूर गावात दहशतीचं वातावरण आहे. लोका मृत्यूच्या सावटाखाली जगत आहे. रात्री अंधार होताच गावकरी एकजूट होतात. हातात काठ्या घेऊन संपूर्ण गाव पहारा देतं. आपलं घर आणि जीव वाचवण्यासाठी, एकत्र येऊन जागावं लागतं, त्यासाठी लोक अक्षरश: मजबूर आहेत. खरंतर, हे गावकरी हत्तींच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून जीवन कंठत आहेत. मिर्झापारूच्या लहुरियादह गावात सध्या भीतीचं सावट आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या जंगलातून एक हत्ती आणि हत्तीण या गावात आलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाहून यूपी बॉर्डरमध्ये दोन हत्ती घुसले. प्रयागराजहून ते मिर्जापूर गावात आले. आपल्या घरातून भटकलेले हे दोन्ही हत्ती सध्या गावात हैदोस माजवताना दिसत आहे. गावात, वस्तीत घुसून ते शेताचं, पिकांचं नुकसान करतात. त्यांच्यामुळे गावकरी भयभीत असून तसेच दहशतीत जगत आहेत. हत्तीत शेतांपर्यंत पोहोचले होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता ते घरांवरही हल्ला करत आहेत. त्यामुळे गावकरी रात्रभर जागून पहारा देतात.
गावकऱ्यांनी काय सांगितलं ?
नाधौली गावातील एका ग्रामस्थाने हत्तींच्या वाढत्या दहशतीबाबत माहिती देताना सांगितलं की, हे दोन्ही हत्ती दोन दिवसांपूर्वी गावात दाखल झाले. त्यांच्या वावरामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेकांना रात्री झोपही लागत नाही. हत्ती रात्रीच्या वेळी गावात शिरत असल्याने लोकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत्ये. जीवाच्या भीतीने अनेकजण घरातच लपून बसतात.
तर कलावती गावातील एका ग्रामस्थाने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की हत्तींनी त्यांच्या घराचं प्रचंड नुकसान केलं. घर उद्ध्वस्त झाल्यानंतर आता करायचं तरी काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. हत्तींनी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून, घर आणि शेती दोन्ही गमावण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे. मात्र, यापेक्षाही आपल्या जीवाला असलेला धोका अधिक चिंतेचा विषय असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
हत्तींचा गावात धूमाकूळ
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही हत्ती मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानातून भटकत या परिसरात आले. हत्ती आणि हत्तीणीच्या या जोडीमुळे परिसरातील अनेक गावांमध्ये दहशत आहे. हत्तींच्या या जोडीने लहुरियादह गावात धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या मका पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. याशिवाय काही घरांच्या छतावरील पटिया (छतावर ठेवण्यात येणारे दगड) देखील तोडण्यात आले. मका पिकाचं नुकसान केल्यानंतर ही जोडी लहुरियादह जंगलातून पुढे जात भैसोड़ बलाय पहाड जंगलात पोहोचली.
हत्तींच्या सततच्या वावरामुळे गावकऱ्यांची झोप उडाली आहे. हत्ती घरांवर हल्ला करून नुकसान करतील, या भीतीने ग्रामस्थ रात्रभर लाठी-काठ्या घेऊन पहारा देतात, तर काहीजण थाळ्या वाजवत हत्तींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत
Leave a Reply