
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत आहे.
अशातच आता अभिनेत्रीने तिचे एका अभिनेत्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो ललित प्रभाकर आहे. लवकरच प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आपल्या सहजसुंदर केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या या जोडीला तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
सध्या तिचे हे ललित प्रभाकरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत.
अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर आता आम्हाला प्रचंड उत्सुकता लागली आहे असं म्हटलं आहे. तसेच काहींनी या दोघांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.




Leave a Reply