• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते थेट भेटणार मुख्यमंत्र्यांना, सुनील तटकरे यांनी म्हटले..

July 17, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अर्थखात्याहून सध्या विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते देण्यास शिंदेंचा विरोध असल्याचे कळतंय. महायुतीमध्ये अर्थखात्याहून घमाशान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थखात्यासाठी आग्रही आहे. हेच नाही तर एकनाथ शिंदे यांनी अर्थखात्याबाबत थेट अमित शाह यांच्याकडे आपली भूमिका मांडली. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले. सुनील तटकरे यांनी म्हटले की, अर्थ खाते हे आमच्याकडेच राहावे याकरिता आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सुनेत्रा पवार यांच्यासह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये, असं शिंदे बोलणार नाहीत.

जयंत पाटील हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. ते 7 वेळा विधीमंडळात गेले आहेत. ते वेगळ्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. शरद पवारांच्या पक्षाची पुढे वाटचाल करण्याचा तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवारांच्या पक्षाने शेवटी कोणासोबत जावे हे शेवटी त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. डिलीमीटेशन बिलासाठी विचार करू अशी सुप्रिया सुळे यांची भूमिका आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली आहेत.आता विलिनीकरणाचा करण्याचा विषय संपला असून आम्ही आता पक्ष बांधणीसाठी काम करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनीही म्हटले आहे. पुढे बोलताना सुनिल तटकरे यांनी म्हटले की, आज आमचा पक्ष बघता अशी कोणतीही चर्चा नाहीये. शरद पवार यांच्याही पक्षाकडून याबाबत चर्चा बंद झाली. वर्षा बंगल्यावरती जयंत पाटील आणि आमची भेट झाली नाही.

मी माझ्या मतदार संघातील काही कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागतिली होती. मुळात म्हणजे काही राजकीय भेट असती तर आम्ही सुनेत्रा पवार यांना सांगितले असते पण ती काही राजकीय भेट नव्हती. काल आमच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात अनेक गोष्टींवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल जे काही सांगायचे होते, ते देखील मी सांगितले. माझ्या मनामध्ये अजित पवार यांच्याबद्दल जो आदर होता तोच आदर सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in