• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिकेतील गोळीबाराचा तो खळबळ उडवणारा व्हिडीओ समोर, जीव वाचवण्यासाठी लोक टेबल खाली लपले, ट्रम्पही..

April 26, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे आयोजित प्रतिष्ठित व्हाइट हाऊस कॉरेस्पोंडेंट्स डिनर दरम्यान अचानक गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री घडली. या वेळी अमेरिकनचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित होते. घटनेनंतर त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

गोळीबाराचा आवाज ऐकताच हॉलमध्ये उपस्थित हजारो लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 2600 हून अधिक पाहुणे या कार्यक्रमात उपस्थित होते. अनेकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी टेबलखाली लपले तर हॉटेलमधील कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी थेट हॉटेलमधून बाहेर पळताना दिसले.

ट्रम्प यांना तातडीने हलवले

गोळीबार होताच सुरक्षारक्षकांनी तत्काळ डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. त्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस देखील उपस्थित होते. सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे गोंधळाचे चित्र दिसते आहे. एका रिपोर्टरने सांगितले की, सुरुवातीला मोठा आवाज ऐकू आला, तो भांड्यांचा आवाज असेल असे वाटले. पण काही सेकंदातच वेटर्स घाबरून पळताना दिसले. तेव्हा परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. लोक टेबलखाली लपले होते आणि काही वेळातच सुरक्षारक्षक बंदुका घेऊन तैनात झाले.

#WATCH | US President Donald Trump and First Lady Melania Trump rushed out of the White House Correspondents’ Dinner after shots were reportedly fired at the event.

(Source: Unrestricted Pool via Reuters) pic.twitter.com/Z2nDjWzWW0

— ANI (@ANI) April 26, 2026

हल्लेखोर अटकेत

या प्रकरणात सुरक्षारक्षकांनी संशयित हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, त्याने गोळीबार का केला, त्याचा नेमका उद्देश काय होता आणि तो कोणाला लक्ष्य करत होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

#WATCH | Attendees seen exiting the White House Correspondents’ Dinner venue after shots were reportedly fired at the event.

(Source: Unrestricted Pool via Reuters) pic.twitter.com/aCUaUMmDgN

— ANI (@ANI) April 26, 2026

कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोर शस्त्रासह कार्यक्रमस्थळी कसा पोहोचला, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षेवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • असा एक देश जिथे पैसे भरून लोक जेलमध्ये जातात, 28 दिवस जेलमध्ये राहून येतात बाहेर, कारण ऐकून बसेल धक्का
  • साधा गणवेश, अनोळखी चेहरा… गर्दीचा भाग होतात सीक्रेट गार्ड; ट्रम्प यांना वाचवण्यासाठी धावले तेव्हा कळलं… कसे असतात सीक्रेट गार्ड?
  • आम आदमी पक्ष सोडताच हरभजन सिंगला सर्वात मोठा झटका… पंजाब सरकारचा मोठा निर्णय; आता फक्त…
  • जगातील सर्वात जुनं जिवंत शहर, जिथे 11000 वर्षांपासून कधीच विझली नाही चूल, कुठे आहे इतिहास जिवंत ठेवणारं हे शहर?
  • कुठेतरी बाहेर लफडं..; घटस्फोटाविषयी राहुल देशपांडे नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in