• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमेरिका-इराण युद्धविराम करारात भारताचा फायदाच फायदा, दोन्ही हात तुपात, थेट..

June 15, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पाकिस्तान आणि कतारने या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून दूर होता. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने या युद्धाचे मोठे परिणाम भारतात बघायला मिळाले. महागाई वाढली. अखेर जगाने सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या युद्धविराम करारात सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झाला असेल तर तो भारत आहे. कारण भारताला असे फायदे मिळणार आहेत जे हा संघर्ष सुरू होण्यापूर्वीही उपलब्ध नव्हते. अमेरिकेने इराणवर अनेक निर्बंध घातली होती. आता ते सर्व निर्बंध उठवले गेले आहेत, ज्याचा बक्कळ फायदा भारताला होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडी खुली झाली, यासोबतच अमेरिका आपले सैन्य होर्मुजमधून माघारी घेणार आहे. यासोबतच इराणच्या तेलावर असलेले सर्व निर्बंध हटवले जातील.

म्हणजेच इराणच्या तेलावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध आता नसणार आहेत. जागतिक बाजारात इराणचे तेल कोणीही खरेदी करू शकते. इराणची अरबो डॉलरची संपत्ती अमेरिकेकडून फ्रीज करण्यात आली. भारत 80 ते 85 टक्के तेल खरेदी करतो. ज्यात सर्वात जास्त खाडी देशांकडून भारत खरेदी करतो. जर इराणी तेल बाजारात आले तर जागतिक बाजाराज कच्च्या तेलाचे भाव कमी होतील. याचा थेट परिणाम जगासोबतच भारतावरही होईल.

यामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या तर परकिय चलनावरील दबाव आपोआप कमी होईल. भारत अगोदर इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत होता. मात्र, अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांनंतर भारताने इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवले. भारतासाठी विशेष बाब म्हणजे भारत आणि इराणमधील व्यापार हा डॉलरमध्ये नाही तर रूपयांमध्ये होतो.

हळूहळू करून इराणवरील निर्बंध हटले तर भारत स्वतामध्ये इराणकडून तेल खरेदी करू शकतो. शिवाय विदेशी मुद्रा वाचवण्यातही मोठे यश मिळेल. याचा थेट परिमाम चाबहार बंदरावर होईल. इराणच्या चाबहार बंदरावर भारताने मोठा पैसा वतला आहे. भारत हा पाकिस्तानला बाजुला करून थेट आशियापर्यंत या बंदराच्या माध्यमातून पोहोचतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in