
अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनरवरून जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याने राजकीय वर्तुळात ‘फोटोवॉर’ची चर्चा रंगली आहे. यावर शहराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करत बॅनर बनवणाऱ्यांकडून चूक झाल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, ‘मी बॅनरवरचा नाही, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. मी राजसाहेबांचा सैनिक आहे,’ असं म्हटलं. बॅनरवर फोटो नसल्याने कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच हा अंतर्गत वाद नसून यापुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, असं शहराध्यक्षांनी सांगितलं.
Leave a Reply