• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील 3 मजले दिले भाड्याने, 21.88 कोटींमध्ये झाली डील, महिन्याची कमाई पाहून बसेल धक्का

August 17, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनयासोबतच त्यांच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळेही चर्चेत असतात. आता त्यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आपल्या कमर्शियल प्रॉपर्टीचे तीन मजले तब्बल 33 लाख रुपये मासिक भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. ही प्रॉपर्टी न्यूट्रिशन ब्रँड ‘TruNativ F&B Private Limited’ला भाड्याने देण्यात आली आहे.

मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांनुसार, अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा परिसरातील लिंक रोडवर असलेल्या सिग्नेचर बिल्डिंगच्या तीन वरच्या मजल्यांचा यामध्ये समावेश आहे. या तिन्ही मजल्यांचे एकूण कार्पेट एरिया सुमारे 8428 चौरस फूट आहे. पाच वर्षांसाठी हा तिसरा मजला भाड्याने देण्यात आला आहे.

या करारानुसार अमिताभ बच्चन यांना दर महिन्याला तब्बल 33 लाख रुपये भाडे मिळणार आहे. म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीत एकूण भाड्याची रक्कम सुमारे 21.88 कोटी रुपये होणार आहे. कार्पेट एरियाच्या हिशोबाने हे भाडे अंदाजे 392 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना इतके आहे.

या करारामध्ये पार्किंगची सुविधाही देण्यात आली आहे. बिल्डिंगमधील निश्चित पार्किंगमध्ये एकूण नऊ गाड्या पार्क करण्याचा अधिकार TruNativला देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने सुमारे 1.98 कोटी रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट जमा केली आहे. करारानुसार दरवर्षी भाड्यात 5 टक्क्यांनी वाढ करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

मुंबईबाहेरही रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीही मुंबईतील व्यावसायिक मालमत्ता भाड्याने दिल्या आहेत. 2023 मध्ये त्यांनी मुंबईतील लोटस सिग्नेचर बिल्डिंगमधील चार ऑफिस युनिट्स वॉर्नर म्युझिक प्रायव्हेट लिमिटेडला दरमहा 17.30 लाख रुपये भाड्याने दिले होते. यामध्ये 12 पार्किंग स्पेसचाही समावेश होता.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी मुंबईबाहेरही रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विशेषतः अयोध्येत त्यांनी जमीन खरेदी केली आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’चे संस्थापक आणि सीएमडी अभिनंदन लोढा यांनी एका रिअल इस्टेट समिटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या अयोध्येतील गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती.

मार्च 2026 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’कडून अयोध्येत 2.67 एकर जमीन तब्बल 35 कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली होती. ही अयोध्येतील त्यांची या डेव्हलपरसोबतची तिसरी गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते.

अभिनय क्षेत्रात अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन आता रिअल इस्टेटमधूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत असल्याचे त्यांच्या या व्यवहारांवरून स्पष्ट होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in