• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘अभिनय सोडून मला तुकाराम मुंढेंच्या…’ ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीची मोठी इच्छा

August 19, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ विकल्या जाणाऱ्या हॉटेल आणि दुकानांवर कारवाई करत, मोठी भूमिका बजावली आहे. आता आयएएस तुकाराम मुंढे यांचे समाजमाध्यमावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांच्या कामगिरीचे सामान्य जनतेला असलेले कौतूकाचे व्हिडीओ ढीगाने व्हायरल होत आहेत. त्यांच्या कामाचं कौतुक आता सेलिब्रिटींकडून देखील होत आहेत. ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्रीने तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ईशा तलवार हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर तर अभिनेत्रीने मोठी इच्छा व्यक्त केली आहे. अभिनेत्री म्हणते, ‘अभिनय सोडून तुकाराम भाऊंच्या टीममध्ये जाण्याचा मी विचार करतेय…’ अशी पोस्ट ईशा हिने केली आहे. एवढंच नाही तर, पोस्टमध्ये अभिनेत्रीने प्रेरणादायी असं देखील लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Talwar (@talwarisha)

 

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तीपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी धडक कारवायांचं सत्रच सुरू ठेवलं आहे. याचा परिणाम विविध ठिकाणी प्रत्यक्षात पहायलाही मिळत आहे.  मुंबईतील स्ट्रीट फूड हा शहराच्या संस्कृतीचा जणू एक भागच आहे. वडापाव, पाणीपुरीपासून भेळ, शोरमापर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मुंबईत रस्त्याच्या कडेला मिळतात. मात्र चव, स्वस्त दर यांसोबतच स्वच्छता आणि अन्नाची सुरक्षितता हा मुद्दाही तितकाच महत्त्वाच आहे. यासाठी मोठी कारवाई सुरु आहे.

अभिनेत्री ईशा तलवार हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये अभिनेत्री माधुरी यादव या भूमिकेत झळकली. माधुरी सीरिजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये झळकली. प्रेक्षकांनी देखील तिच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. अनेत दाक्षिणात्या सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘ट्यूबलाईट’, ‘कालाकांडी’, ‘रन बेबी रन’, ‘कामयाब’, ‘शर्माजी नमकीन’, ‘परछाई’, ‘मिर्झापूर’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिनेमा आणि सीरिजमध्ये अभिनेत्री महत्त्वाची भूमिका बजावली.

ईशा तलवार सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

 

 

 





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in