• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठे यश, हायकोर्टाकडून थेट नोटिस जारी,सात तासात नेमके काय घडले ?

August 16, 2026 by admin Leave a Comment


मुंबई हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवरुन विद्यार्थ्यांनी राज्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले आहेत. या आंदोलनात सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांना पाठींबा देत आहेत. या ऑनलाईन लिपिक परीक्षेत मोठ्या त्रूटी उघडकीस आल्या होत्या.अनेक सेंटरवर सर्व्हर डाऊन झाला होता. तर काही सेंटरवर पुरवलेले संगणकीय किबोर्ड नादुरुस्त होते. त्यामुळे विद्यार्थी दहा मिनिटात लॉग आऊट होत होते. त्यांना विद्यार्थ्यांना अपात्र केल्याने चिडलेल्या विद्यार्थ्यांनी टिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनाला अभिजीत दीपके यांनी पाठिंबा देत, जिल्हा न्यायाधीशांची भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला. तर कल्याण येथे सत्र न्यायाधीशांची कार विद्यार्थ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रात्री उशीरा या प्रकरणात हायकोर्टाने दखल घेत नोटीस जारी केली आहे.

हायकोर्ट क्लार्क लिपिक ऑनलाईन परीक्षेसाठी यंदा राज्यभरात सेंटर जारी करण्यात आली होती. कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षे दरम्यान अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना जावे लागले. अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होते. तर पुरवण्यात आलेले संगणकाचे किबोर्ड देखील बटण तुटलेले होते. आणि अवघ्या दहा मिनिटात विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून लॉग आऊट करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातून या परीक्षेला बसण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कल्याण, संभाजीनगरात निदर्शने आणि टिय्या आंदोलन सुरु केले.

यानंतर अभिजीत दीपके यांनी संभाजीनगरात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेत ते स्वत: विद्यार्थ्यांसोबत निदर्शने करीत ठिय्या आंदोलनास बसले. या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसोबत अभिजीत दीपके यांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी उशीरा विद्यार्थ्यांच्या शिष्ठमंडळाला परीक्षा केंद्रात भेटण्यासाठी बोलवण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा हायकोर्टाने या संदर्भात नोटीस काढली आहे. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण येथे न्यायाधीशांची गाडी अडवली

कल्याण एपीएमसी मार्केटमधील ‘हायकोर्ट क्लार्क टायपिंग स्किल टेस्ट’ दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थ्यांचे आंदोलन आणखी तीव्र झाले. संतप्त विद्यार्थ्यांनी कल्याण सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश परविन सय्यद यांच्या गाडीला घेराव घालत तब्बल दीड तासांहून अधिक काळ त्यांना रोखून धरले.”टेक्निकल इश्यू असलेल्या केंद्रांची परीक्षा पुन्हा घेऊ” असे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.

तरीही परीक्षा केंद्राकडून लेखी आश्वासन देण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम होते. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक संकेश भोईर आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले आहे. न्यायाधीश स्वतः कारममध्ये बसून राहिले आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत सुरू होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in