
अभिजीत दीपके यांची सीजेपी सध्या चर्चेत आहे. मात्र या सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ( सीजेपी ) चे सह संस्थापक सौरभ दास मात्र सध्या वेगळ्यात समस्येने त्रस्त आहेत. सध्या इतके त्रस्त आहेत की त्यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सौरभ दास यांनी सोशल मीडिया कमेंटेटर अभिजीत अय्यर मित्रा, पॅम्पलेट, लॉ बीट सारख्या काही न्यूज प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया अकाऊंटच्या विरोधात ही याचिका दाखल करीत तक्रार केली आहे. त्यांचे भाड्याने रहात असलेले निवास स्थान आणि वैयक्तिक माहितीला न्यूज प्लॅटफॉर्मनी सार्वजनिक केल्याने ते संतापले आहेत. त्यामुळे आपल्या प्रायव्हसीचे उल्लंघन झाल्याने दास यांनी २.०१ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply