• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनेक वर्ष थायरॉईडचा करताय सामना? जाणून घ्या औषधांशिवाय आजार नियंत्रणात ठेवता येतो का?

June 16, 2026 by admin Leave a Comment


आजच्या जीवनशैलीमुळे थायरॉईड समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैली झाली आहे की, लहान मुली देखील थायरॉईड सारख्या समस्येचा समना करत आहेत. पाहायला गेलं तर, 100 पेक्षा 95 महिला थायरॉडचा सामना करत आहेत. जेव्हा थायरॉक्सिन हार्मोनचं संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात थकवा, अनावश्यक वजन वाढणं किंवा कमी होणं आणि मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या हजारो समस्या निर्माण होतात. मात्र, सोशल मीडियावर थायरॉईडबद्दल पसरलेल्या असंख्य दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे, त्याच्या खऱ्या उपचार पद्धतीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
अनेकदा नेटकऱ्यांचा असा दावा असतो की, केवळ विशिष्ट आहार, हर्बल पेये किंवा योगाभ्यासानेच थायरॉईड पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण वैद्यकीय शास्त्र काय सांगते? याबद्दल कोणाला माहिती नसतं. मुंबईतील नामवंत डॉक्टरांनी या विषयावर आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

डॉ. निमित नागरा यांच्या मते, “थायरॉईडच्या समस्या सहसा आपोआप बऱ्या होत नाहीत. हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता असते. उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात ही समस्या अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.”

दुसरीकडे, मधुमेह तज्ज्ञ आरती उल्लाल यांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये केवळ टिप्स किंवा जीवनशैलीतील बदलांनी थायरॉईड बरा करणं शक्य नसतं. उपचारांशिवाय या समस्येपासून सुटका मिळवणे खूप कठीण आहे.जीवनशैलीतील बदल आणि सकस आहार थायरॉईडचं कार्य टिकवून ठेवण्यास निश्चितपणं मदत करू शकतात, परंतु ते औषधोपचारांना पूरक ठरू शकतात हा पर्याय कधीच नाही.

दीर्घकाळ व्यायाम किंवा आहारामुळे कधीकधी हार्मोनची पातळी तात्पुरती सामान्य होऊ शकतं, परंतु हा आराम फार काळ टिकत नाही. डिटॉक्स ड्रिंक्स, हर्बल सप्लिमेंट्स किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टिप्सचं सेवन करून हार्मोनल चढउतार नियंत्रित करणं शक्य नाही. याउलट, चुकीच्या गोष्टींचं सेवन केल्यानं शारीरिक गुंतागुंत आणखी वाढू शकते.

गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल होत असले तरी, प्रसूतीनंतर ते बहुतेकदा नैसर्गिकरित्या पूर्ववत होतात. काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे किंवा थायरॉईड ग्रंथीला अचानक सूज आल्यामुळे तात्पुरते चढ-उतार होऊ शकतात. एकदा मूळ कारण दूर झालं की, थायरॉईडची समस्याही दूर होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष कधीच करु नका. घरगुती उपाय किंवा इंटरनेटच्या आधारे स्वतःचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. योग्य उपचार आणि आवश्यक जीवनशैलीतील बदलांच्या संयोगाने या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
  • Tata Sierra EV ‘या’ दिवशी होणार लॉन्च, शक्तिशाली QWD डुअल मोटरसह टीझर रिलीज
  • शिवसेना शिंदे गटात येण्याची घोषणा करण्यापूर्वी नेमकं काय घडलं? ओमराजेंबाबत खळबळजनक माहिती समोर, रात्री दोन वाजता…
  • Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
  • Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in