• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर इमरान खान तुरुंगातून बाहेर, मध्यरात्री पाकिस्तानात मोठ्या घडामोडी

August 21, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना अखेर इस्लामाबादमध्ये असलेल्या शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रात्री एक वाजता जेलमधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्यांना आता उपचारासाठी शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल परिसरात कडकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत इमरान खान यांचे वकील खालिद यूसफ चौधरी यांनी ट्विटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. इमरान खान यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यावं, अशी मागणी होत होती. त्यासाठी 27 मार्च 2026 पासून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर अखेर आता पाकिस्तान सरकारने इमरान खान यांना तुरुंगातून बाहेर काढून रुग्णालयात शिफ्ट केलं आहे.

सुप्रीम कोर्टाचे आदेश

इमरान खान यांना योग्य उपचार मिळण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी इमरान खान यांच्या वकिलाकडून सु्प्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. अखेर सुप्रीम कोर्टाकडून पाकिस्तान सरकारला इमरान खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रात्री एक वाजता पाकिस्तान सरकारने इमरान खान यांना जेलमधून बाहेर काढत उपचारासाठी शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात दाखल केलं आहे. या परिसरात सरकारच्या वतीने कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रुग्णालयालाच सब जेल म्हणून घोषित करणार

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षेचा मुद्दा पुढे करत आता सरकारकडून इमरान खान यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्या रुग्णालयाला सब जेल म्हणून घोषित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान इमरान खान जेलमध्ये असताना त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकवेळी सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांच्या नातेवाईकांना इमरान खान यांची भेट नाकारण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानंतर आता इमरान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in